'विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई न झाल्यास सरकारला बांगड्यांचा आहेर पाठविणार'

 महाबळेश्‍वरला विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकावर कठोर कारवाई न झाल्यास शासनास बांगड्यांचा आहेर पाठविण्याचा इशारा रिपाइंने दिला आहे.
सातारा :
 
विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करावी, तसेच वीजतोडणी थांबवावी, यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निदर्शने केली. याबाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे. 


या आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, संगीता शिंदे, वर्षा औंधकर, संध्या भिसे, शामिनी निंबाळकर, महादेवी नलवडे, अंजना अडागळे, सुजाता शिंदे, अनिता शिंदे, भरत अडागळे, राहुल आवळे, विजय ओव्हाळ, बंटी भोसले, किरण ओव्हाळ, भिकाजी सावंत व इतर महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. महाबळेश्‍वरला विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकावर कठोर कारवाई न झाल्यास शासनास बांगड्यांचा आहेर पाठविण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area