ही कातडी परीक्षणासाठी लॅबला पाठवण्यात येत आहे. अनेकदा इतर प्राण्याच्या कातडीला रंग देऊन हरणाची कातडी म्हणून विक्री केली जाते. नागरिकांनी वन्य प्राण्यांच्या कातडी, हडे शिंगे अथवा मोराची पिसे अशा वस्तू कधीही खरेदी करू नये, असे न झाल्यास शिकारीला आळा बसेल. - इरशाद शेख, विभागीय वन आधिकारी, वन्य जीव
रविवारी (ता. 14) संध्याकाळी सहाच्या दरम्यान नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे पप्पू जमादार यांना अतिश म्हेत्रे यांनी देगाव परिसरात चितळ जातीच्या हरिणाची कातडी आढल्याचे दूरध्वनीवरून सांगितले. जमादार यांनी लगेच या घटनेची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांना दिली. घटनास्थळी वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे भरत छेडा, पप्पू जमादार, अकबर शेख, आदित्य घाडगे, इम्रान सगरी यांनी जाऊन पाहणी केली असता कचरा फेकण्याच्या जागी बेवारस अवस्थेत ही कातडी कोणीतरी फेकून दिलेली होती. वनविभागकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
ही कातडी परीक्षणासाठी लॅबला पाठवण्यात येत आहे. अनेकदा इतर प्राण्याच्या कातडीला रंग देऊन हरणाची कातडी म्हणून विक्री केली जाते. नागरिकांनी वन्य प्राण्यांच्या कातडी, हडे शिंगे अथवा मोराची पिसे अशा वस्तू कधीही खरेदी करू नये, असे न झाल्यास शिकारीला आळा बसेल. - इरशाद शेख, विभागीय वन आधिकारी, वन्य जीव
रविवारी मिळालेल्या माहितीनुसार घटनस्थळी भेट दिली असता बेवारस स्थितीत कातडी आढळली. कातडी बरीच जुनी आहे. पुढील तपासानंतर नेमकी कोणत्या प्राण्यांची आहे, हे समजेल. सध्या तपास सुरू आहे. -धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक