'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे'; उदयनराजे-शंभूराजेंच्या 'दोस्ती'ची राज्यभरात तुफान चर्चा

 मंत्री देसाई आणि खासदार उदयनराजे हे काॅलेज जीवनापासून एकमेकांचे मित्र. काॅलेजातील कयिक खिस्से त्यांनी वेळोवेळी सातारकरांना जाहीर करुन दाखवले आहेत.
सातारा :

साताऱ्यातील कार्यक्रम उरकून कोल्हापूरला एका लग्न समारंभासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई निघाले होते. त्याचवेळी खासदार उदयनराजे भोसले हे ही गोव्याकडे निघाले असता, मंत्री देसाईंच्या गाड्यांचा ताफा पाहून उदयनराजेंनी त्यांची गाडी ताफ्यासोबत नेऊन उभी केली. महामार्गावरच दोघेही गाड्यातून खाली उतरले आणि शंभूराज देसाईंनी नेहमीप्रमाणे उदयनराजेंना मुजरा केला, तर मैत्रीच्या नात्याने उदयनराजेंनी देसाईंना मिठी मारली आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे' या गाण्याची झलक या दोन्ही राजेंच्या मैत्रीच्या निमित्ताने अनुभवायला मिळाली. 

मराठा आरक्षणावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर सडेतोड टीका करत आरक्षणासाठी रक्तपात होईल, असा इशारा दिला होता. त्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी उदयनराजेंनी रक्तपाताची भाषा करू नये, सरकारचे काम योग्य दिशेने सुरू असल्याचे प्रतिउत्तर दिले होते. त्यानंतर काल गृहराज्यमंत्री साताऱ्यातील कार्यक्रम उरकून कोल्हापूरला एका लग्न समारंभासाठी निघाले होते. त्याचवेळी खासदार उदयनराजे भोसले ही गोव्याकडे निघाले होते. मंत्री देसाईंच्या गाड्यांचा ताफा पाहून उदयनराजेंनी त्यांची गाडी ताफ्यासोबत नेऊन उभी केली. महामार्गावरच दोघेही गाड्यातून खाली उतरले आणि एकमेकांना अलिंगन दिले. राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरुपी शत्रू नसतो. याची प्रचिती आपल्याला वारंवार पहायला मिळते. 

मंत्री देसाई आणि खासदार उदयनराजे हे काॅलेजपासून एकमेकांचे मित्र. त्यांचे काॅलेज जीवनातील काही खिस्से त्यांनी वेळोवेळी जाहीर करुनही दाखवले आहेत. त्यांच्या या दिलखुलास मैत्रीची झलक अनेक वेळा सातारकरांनी अनुभवली आहे, पाहिली आहे. जरी ते राजकारणात एकमेकांचे विरोधक असले, तरी आपल्या जीवनात ते एकमेकांचे खास दोस्त आहेत, याची प्रचिती त्यांनी सातारा येथील महामार्गावर पुन्हा एकदा दाखवून दिली. या त्यांच्या मैत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्याला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area