खळबळजनक! सोलापुरात महिला कॉन्स्टेबलची आत्महत्या

 एका महिला कॉन्स्टेबलने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर-तुळजापूर मार्गावर हगलूर गावाजवळ या महिला कॉन्स्टेबलने विष प्राशन केले. उपचारापूर्वीच या कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला.सोलापूर:
 एका महिला कॉन्स्टेबलने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर-तुळजापूर मार्गावर हगलूर गावाजवळ या महिला कॉन्स्टेबलने विष प्राशन केले. उपचारापूर्वीच या कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. (suicide of a lady constable in solapur)


ही महिला कॉन्स्टेबल ज्या पोलिस ठाण्यात काम करत होती, त्याच पोलिस ठाण्यातील एक वरिष्ठ अधिकारी या कॉन्स्टेबलला वॉट्सॲपवर मॅसेज करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. याद्वारे हा अधिकारी तिला मानसिक त्रास देत होता आणि यामुळेच या कॉन्स्टेबलने आत्महत्या केली असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.


मानसिक त्रास देणारा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करत असून केतन मांजरे असे त्याचे नाव आहे. मांजरे यांनीच या महिला कॉन्स्टेबलला मानसिक त्रास दिल्याचे कुटुंबीय सांगतात. या घटनेबाबत पोलीसांनी मात्र अद्याप कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.


या मृत महिलेचे आणि पोलीस उपनिरीक्षकाचे व्हॉट्सअॅपवरील चॅटिंग तिच्या नवऱ्याने पाहिले होते. यामुळे रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. मात्र, ही आत्महत्या नेमकी कशामुळे घडली याची चौकशी करूनच गुन्हा नोंद करणार असल्याचेपोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी सांगितले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area