चोरी, जुगारातही आता पिंपरी-चिंचवडमधील पुढाऱ्यांची नावे अव्वल

 मारहाण, दमदाटी, फसवणूक अशा प्रकरणात कमी होते म्हणून की काय आता चोरी व जुगार अड्ड्यावरील छाप्यातही लोकप्रतिनिधी व त्यांचे सगेसोयरे सापडू लागले आहेत. जनतेच्या सेवेसाठी निवडून आलेले लोकप्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधित्व करायचे सोडून त्यांच्यावर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची वेळ आली आहे.पिंपरी - मारहाण, दमदाटी, फसवणूक अशा प्रकरणात कमी होते म्हणून की काय आता चोरी व जुगार अड्ड्यावरील छाप्यातही लोकप्रतिनिधी व त्यांचे सगेसोयरे सापडू लागले आहेत. जनतेच्या सेवेसाठी निवडून आलेले लोकप्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधित्व करायचे सोडून त्यांच्यावर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची वेळ आली आहे. पिंपरी शहरात दोन महिन्यात असे सहा प्रकार उघडकीस आले असून, त्यातील आरोपींमध्ये लोकप्रतिनिधी अथवा त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

निवडणुकीत निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी नागरिकांची सेवा करणे अपेक्षित असते. त्यासाठीच त्यांना निवडून दिलेले असते. मात्र, अनेकजण पदाचा गैरवापर करतात. लोकप्रतींनिधींसह त्यांचे कुटुंबीय, सगेसोयऱ्यांकडूनच कायदा हातात घेतला जात आहे. सत्तेच्या जोरावर काहीही करता येऊ शकते, असा चुकीचा समज असतो. दरम्यान, लोकप्रतिनिधीच असे वागत असतील सामान्य नागरिकांनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा असा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात मागील दोन महिन्यात पाच ते सहा घटना घडल्या. मारहाण, फसवणूक, दमदाटी, शिवीगाळ यासह चोरी व जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता त्यामध्येही लोकप्रतिनिधी अथवा त्यांचे सगेसोयरे आढळले. अशांना खरंच लोकप्रतिनिधी म्हणावे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

निवडून आल्यानंतर पद, सत्ता, प्रतिष्ठा मिळते. मात्र, याचा दुरुपयोग केला जातो. आपल्याला कोणी काही करू शकत नाही, अशा आविर्भावात असलेली ही मंडळी चुकीची कामे करण्यासही धजावतात. चुकीची कामे करून एखाद्या प्रकरणात अडकल्यास राजकीय वजन वापरून सुटका करून घेता येते, असा समज झालेला आहे. 

मागील दोन महिन्यांतील घटना

सावरदरी येथील कंपनीतील गिअर बॉक्‍सचे सहा बेअरिंग चोरून नेल्याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी मागील महिन्यात तिघांवर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेविका कमल घोलप यांचे पती बापू ऊर्फ अनिल घोलप यांच्यावरही गुन्हा 

बँकेची फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर करणे याप्रकरणी माजी नगरसेवक व दि. सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी यांच्यावर पिंपरीसह इतर ठाण्यातही गुन्हा दाखल आहे. पिंपरीतील गुन्ह्यात त्यांना अटकही केली

बँकेची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवक व बँकेचे अध्यक्ष विलास नांदगुडे यांच्यासह नऊ जणांवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अपघाताचा जाब विचारत मोटारचालकाला नगरसेविकेच्या मुलाने धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची घटना मागील महिन्यात हिंजवडी येथे घडली होती. राजदीप हेमंत तापकीर असे नगरसेविकेच्या मुलाचे नाव असून महापालिकेतील भाजप नगरसेविका सुनीता तापकीर यांचे ते चिरंजीव

मागील आठवड्यात थेरगावात एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वाकड पोलिसांनी छापा टाकला. यातील आरोपींमध्ये भाजप नगरसेविका व शिक्षण समितीच्या सभापती मनीषा पवार यांचे पती प्रमोद पवार याचा समावेश

जागा विकसित करण्याच्या बहाण्याने पैसे घेत एकाची फसवणूक केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी राजू लोखंडे (वय ५०) यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल केला. राजू लोखंडे हे माजी नगरसेवक असून, त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका आहेत


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area