दोन घरफोड्यांमध्ये लाखाचा ऐवज लंपास

 शहरातील अलंकार व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन घरफोड्यांत चोरट्यांनी एक लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून पळविल्याचा प्रकार समोर आला आहे.पुणे :शहरातील अलंकार व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन घरफोड्यांत चोरट्यांनी एक लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


लक्ष्मीनगर परिसरात राहणारे लक्ष्मी मरगु माने (वय ५०) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. माने कामाच्या निमित्ताने लातूर येथे घर बंद करून गेले होते. चोरट्यांनी माने यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत आत प्रवेश केला. त्यानंतर आतील खोलीचे कुलूप तोडून ४३ हजार २५० रुपये किमतीचे दागिने चोरून पसार झाले. माने परत आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार आढळून आला. या प्रकरणी त्यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


नवी पेठ येथील पर्वती किरण सोसायटी येथे राहणारे हेमंत राजाराम हिर्लेकर (वय ५९) हे त्यांच्या परिवारासह मुलीच्या घरी गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यांच्या बेडरूमच्या कपाटातील ९३ हजार रुपये किमतीचे ४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तक्रारदार घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस तपास करत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे प्रकार सुरूच आहेत. मात्र, या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area