मुंबईहून घेऊन आला होता ड्रग्ज, रामपूरमध्ये मुसक्या आवळल्या

 मुंबईहून ड्रग्ज आणणाऱ्या तस्करासह त्याच्या साथीदाराच्या उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये मुसक्या आवळल्या आहेत. बरेली एसटीएफ पथक आणि रामपूर पोलिसांनी ही कारवाई केली.

रामपूर: 
उत्तर प्रदेशातील सिव्हिल लाइन्स पोलीस आणि बरेली एसटीएफने एका ड्रग तस्कराला अटक केली आहे. ड्रग तस्करचे कनेक्शन मुंबईशी जोडलेले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बाबू आणि बबलू अशी दोघा तस्करांची नावे आहेत. बाबूने मुंबईहून ड्रग नेले होते. ते बबलूला देणार होता. पोलिसांना याबाबत खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली. त्याआधारे बरेली एसटीएफ आणि रामपूर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. सिव्हिल लाइन्स परिसरात पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडील अडीचशे ग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहे.

ड्रग तस्करीत अटक केलेले बबलू उर्फ जफर आणि बाबू हे दोघे रामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. या हद्दीतील एका घरावर एनसीबीने छापेमारी केली होती. मात्र, तिथे एनसीबी पथकाच्या हाती काहीही लागले नाही. पोलिसांनी बाबू आणि बबलू याला अटक केली आहे. त्यांच्याविरोधात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत कारवाई करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. त्यांच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. एसटीएफला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई केली आहे. आरोपीने मुंबईहून ड्रग्ज आणले होते, अशी माहिती चौकशीतून उघड झाली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area