बेकायदेशीरपणे विक्रीसाठी जनावरे नेत असताना गावभाग पोलिसांनी एकाला केली अटक ; 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

 


इचलकरंजी: छोटा हत्ती टेम्पोतून बेकायदेशीरपणे विक्रीसाठी जनावरे नेत असताना गावभाग पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अरुण अनिल गोसावी (वय 27 रा. बिरदेवनगर, रेंदाळ) असे त्याचे नांव आहे. या कारवाईत टेम्पोसह तीन म्हैशी असा 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोकॉ राम पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील रिंगरोडवर संशयावरून गावभाग पोलिसांनी छोटा हत्ती (क्र. एमएच 08 एच 7136) ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या दाटीवाटीने म्हैशी भरून त्यांचा दुरूपयोग करण्यासाठी वाहतुक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी अरुण गोसावी याला अटक केली आहेत. तर 80 हजाराचा छोटा हत्ती टेम्पो, प्रत्येकी 10 हजार रुपयांचया 3 म्हैशी असा 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area