अरे बाप रे। 50 पैकी 2 भाजीविक्रेते पॉजीटिव्ह

 


इचलकरंजी : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खबरदारी म्हणून गुरुवारी आण्णा रामगोंडा  भाजी मार्केटमधील सुमारे 50 भाजीपाला विक्रेत्यांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 1 महिला व 1 पुरुष अशा दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी जागरुक होऊन शासन निर्बंधांचे पालन करुन स्वत:सह इतरांना आणि पर्यायाने शहराला वाचवावे असे आवाहन केले जात आहे.

शहर आणि परिसरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने भाजीपाला विक्रेत्यांची अ‍ॅन्टीजेन रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी आण्णा रामगोंडा शाळेसमोरील भाजी मार्केटमधील भाजीपाला विक्रेत्यांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. सुमारे 50 जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 1 महिला आणि 1 पुरुष अशा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या दोघांनाही इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


शहरातील सर्वच ठिकाणी बसणार्‍या भाजीपाला विक्रेत्यांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदी करताना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. या मोहिमेत नगरपरिषदेच्यावतीने उपमुख्याधिकारी केतन गुजर, मुख्य स्वच्छता निरिक्षक सुर्यकांत चव्हाण, लिपिक खेमचंद लालबेग, रफिक पेंढारी, प्रभारी मुकादम पियुष लालबेग, परशराम आदेंद्रा, हरीश कांबळे, बाळू गुळीग, तानाजी कांबळे आदींनी सहभाग घेतला.


 2 out of 50 vegetable sellers are positive

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area