मिनाज जमादार यांची माहिती

 हेरवाड येथील अंगणवाडी बांधकामासाठी ८ लाख 50 हजाराचा निधी

 


हेरवाड  : पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटील यांच्या प्रयत्नातून हेरवाड येथील अंगणवाडी क्रमांक ३९५ (काळम्मावाडी वसाहत ) नवीन इमारत बांधकाम करणे साठी आठ लाख पन्नास हजार रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या मिनाज जमादार यांनी दिली.

हेरवाड येथील अंगणवाडी क्रमांक ३९५ (काळम्मावाडी वसाहत) आणि अंगणवाडी क्रमांक २८६ (संतुबाई मंदिर ) या दोन्ही अंगणवाडी स्वतंत्र इमारत नसल्याने दुसऱ्या ठिकाणी भरत होत्या. इमारतीच्या स्व:मालकिच्या जागा असून निधी उपलब्ध नसल्याने इमारत बांधकाम करणे कठीण झाले होते.अंगणवाडी मध्ये येणाऱ्या लहान मुला-मुलींची गैरसोय होत होती.यासंदर्भात अंगणवाडी प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मिनाज जमादार यांच्या कडे निधी मंजूर करून मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.या गोष्टींची माहिती घेऊन पंचायत समितीच्या माजी सभापती आणि विद्यमान सदस्या मिनाज युनुसअल्ली जमादार यांनी दोन्ही अंगणवाडी इमारत बांधकाम करणे या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटील यांच्याकडे निधी मागणीचे निवेदन दिले होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत या दोन्ही अंगणवाडी पैकी अंगणवाडी क्रमांक ३९५ (काळम्मावाडी वसाहत) या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्याचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र मिळाले आहे.लवकरच याचे पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार करून निवीदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाची सुरुवात केली जाणार आहे.

अंगणवाडी क्रमांक २८६ (संतुबाई मंदिर ) इमारत बांधकाम करणे या कामासाठी पुढील निधी उपलब्ध झाल्या नंतर निधी देण्यात येईल असे आश्वासन पालक मंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटील यांनी दिले.

ही कामे मार्गी लागण्यासाठी जिल्ह्याचे नेते आणि पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी.पाटील, तालुक्याचे नेते गणपतराव पाटील , महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.पद्माराणी पाटील , उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सोमनाथ रसाळ यांचे सहकार्य लाभले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area