अनिल देशमुखांचा राजीनामा, कंगना रनौत म्हणते ‘यह तो सिर्फ़ शुरुआत है…’

 कंगना रनौत सोशल मीडियाच्या माध्यमातून बेधडकपणे आपली मतं मांडत असते. 2020मध्ये पालघर साधू मॉब लिचींग प्रकरणानंतर कंगनाने उघडपणे महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले होते.


मुंबई :
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज (5 एप्रिल) राजीनामा दिला आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी आता आपला राजीनामा सादर केला आहे. ही माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली. अशा परिस्थितीत बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत (kangana Ranaut) हिने अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे (Actress kangana Ranaut slams Anil Deshmukh after resignation).


कंगना रनौत सोशल मीडियाच्या माध्यमातून बेधडकपणे आपली मतं मांडत असते. 2020मध्ये पालघर साधू मॉब लिचींग प्रकरणानंतर कंगनाने उघडपणे महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अगदी असेही म्हटले होते की, कंगनाला येथे राहण्याचा काहीही अधिकार नाही. आता राजीनामा दिल्यानंतर यावरूनच कंगनाने अनिल देशमुख यांना लक्ष्य केले आहे.


पाहा कंगनाचे ट्विटकंगनाच्या एका चाहत्याने सप्टेंबर 2020मधील कंगनाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील घराची तोडफोड केली होती. यानंतर कंगनाने व्हिडीओद्वारे महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर टीका केली होती.


आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा टॅग करत लिहिले की, ‘साधूंची हत्या करुन महिलेचा अपमान करणार्‍यांची पडझड निश्चित आहे.’ हा व्हिडीओसध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कंगनाने स्वतःदेखील हा व्हिडीओ ट्विट करत, ‘जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे बघा आणखी कायकाय होते..’ असे म्हटले आहे. यावर नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत (Actress kangana Ranaut slams Anil Deshmukh after resignation).


काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिलं होतं. इतकंच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं.


त्याचवेळी अॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही. यावर अनिल देशमुख यांनी स्वतःहून आपला राजीनामा सादर केला आणि गृहमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area