Amravati : पोलिसांनी सापळा रचला होता, दोन कार भरधाव येत होत्या, त्याचवेळी...

 अमरावती शहरातील गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करून गांजाचा मोठा साठा पकडला आहे. दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. कारमधून ३६६ किलो गांजा जप्त केला आहे.
अमरावती : अमरावती शहरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली. पथकाने दोन कार आणि त्यातील ३६६ किलो

गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ४६ लाखांहून अधिक रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


शहरात गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दोन कारसह ३६ लाख ६१ हजार १०० रुपये किंमतीचा ३६६ किलो गांजा जप्त करण्यात आला. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इकबाल कॉलनीत दोन कारमधून गांजा इकबाल कॉलनीत आणण्यात येत होता. पोलिसांना याबाबत खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. त्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला. सकाळी ९ वाजता पोलिसांनी दोन्ही कारची झडती घेतली. कारमध्ये ३६ लाख ६१ हजार रुपये किंमतीचा ३६६ किलो गांजा होता. कार आणि गांजा असा एकूण ४६ लाख ६१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.


या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. अवैध धंद्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचे पोलीस विभागाचे प्रयत्न असून, विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे शहरातील विविध भागात कारवाया सुरू आहेत. त्यानुसार, मोठ्या प्रमाणात शहरात गांजा विक्रीसाठी आणण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, पोलीस हवालदार राजुआप्पा बाहेनकर, फिरोज खान, अजय मिश्रा, जावेद अहमद, पोलीस नाईक सतीश देशमुख, नीलेश पाटील, सुधीर गुडधे, पो. अंमलदार दिनेश नांदे, एजाज शहा, निवृत्ती काकड, उमेश कापडे, चालक पोलीस अंमलदार प्रशांत नेवारे यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईमुळे गांजाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area