100 कोटी वसुलीचे आरोप असलेल्या अनिल देशमुखांकडे कोटींची संपत्ती; रिलायन्सशी भागीदारी

 चौकशीचा आदेश होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. परंतु तुम्हाला माहीत आहे का? राष्ट्रवादीच्या या नेत्याकडे किती कोटींची मालमत्ता आहे. Anil Deshmukh has assets worth crores
नवी दिल्लीः 100 कोटी रुपये वसूल करण्याच्या आरोपावरून राजीनामा देणारे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या चर्चेत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत. चौकशीचा आदेश होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. परंतु तुम्हाला माहीत आहे का? राष्ट्रवादीच्या या नेत्याकडे किती कोटींची मालमत्ता आहे. (Anil Deshmukh, who is accused of recovering Rs 100 crore, has assets worth crores; Partnership with Reliance)


अनिल देशमुख हे नागपूर जागेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार

2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख हे नागपूर जागेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आलेत. ADR वरील उपलब्ध माहितीनुसार, त्यांची एकूण मालमत्ता 14.57 कोटी आणि लाएबिलिटी 4.56 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये त्यांनी 16 लाख 85 हजार 193 रुपये परतावा दाखल केला. 3.12 लाख रोख आणि 7.25 लाख बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये जमा करण्यात आले आहेत. त्याशिवाय त्यांनी बाँड, शेअर्स आणि डिबेंचरमध्येही 3.86 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. एलआयसीने 2.97 लाख आणि दागिन्यांमध्ये 29.26 लाखांची गुंतवणूक केलीय.


रिलायन्ससह कोणत्या शेअर्समध्ये केलीय गुंतवणूक?

अनिल देशमुख यांनी 242 रुपयांचे रिलायन्स पॉवरमध्ये 93 शेअर्स खरेदी केलेत, दुसरीकडे 8760 रुपयांमध्ये Integra Engineering चे 200 शेअर्स खरेदी केलेत, रिलायन्स इंडस्ट्रीजचे 120 शेअर्स 156444 रुपयांत खरेदी केलेत. त्याशिवाय त्यांनी 3200 रुपयांमध्ये रमा पेट्रोकेमिकल्सचे 400 शेअर्स खरेदी केले असून, ग्लेनमार्क फार्माच्या शेअर्समध्ये 16295 रुपये गुंतवले आहेत, ल्युपिनच्या शेअर्समध्ये 20358 रुपये, मारुतीच्या शेअरमध्ये 169650 रुपये गुंतविले आहेत.


स्थावर संपत्तीची माहिती

याशिवाय त्यांनी एलआयसीमध्ये 2.97 लाख, दागिन्यांमध्ये 29.26 लाख आणि इतर मालमत्तांमध्ये 1.25 कोटींची गुंतवणूक केली आहे. स्थावर मालमत्तेबद्दल सांगायचे झाल्यास त्यांच्याकडे शेती असणाऱ्या जमिनीचे मूल्य 1.19 कोटी, नॉन शेती योग्य जमीन 4.15 कोटी, व्यावसायिक इमारत 2.23 कोटी आणि निवासी इमारत 5.27 कोटी आहे. हे एकूण मूल्य 12.85 कोटी आहे. या व्यतिरिक्त त्यांनी 57.12 लाख रुपयांचे कर्ज आणि बँक आणि वित्तीय संस्थांकडून 3.99 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. अशा प्रकारे एकूण लाएबिलिटी 4.60 कोटी रुपये आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area