रेमडेसिविरप्रकरणी आणखी एकास अटक.

 कोल्हापूर : रेमडेसिविर हे जीवनरक्षक इंजेक्शन काळ्याबाजारात (black market) विकणाऱ्या रॅकेटमधील आणखी संशयितास पोलिसांनी अटक केली. सागर महाबळेश्वर सुतार (वय २४, रा. जाधव पार्क, उजळाईवाडी) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे.या प्रकरणात मंगळवारी अटक केलेल्या योगिराज राजकुमार वाघमारे (रा. सासने मैदान, कोल्हापूर, मूळगाव मोहोळ, सोलापूर) व पराग विजयकुमार पाटील (वय २६, रा. गणेश काॅलनी, कसबा बावडा) या दोघांना खासगी रुग्णालयात (private hospital) काम करणाऱ्या संशयित फार्मासिस्ट सागर याने रेमडेसिविर पुरवठा केल्याचे तपासात निष्पन्न झाले.


 कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे जीवनरक्षक रेमडेसिविरचा काळाबाजार (black market)  होत आहे. त्याची विक्री करणारी टोळी कार्यरत होती. त्यात हा संशयित सागरही होता. त्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. तत्पूर्वी वाघमारे व पाटील यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी त्यांना न्यायालयात (court) हजर केले असता चार दिवसांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area