आजीचा हात सोडून चिमुकला रस्त्यावर धावला आणि बाईकखाली आला…

 बीडमधील चिमुकला रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीच्या अचानक समोर गेला. त्याला बाईकची जोरदार धडक बसली आणि तो जवळपास बाईकखाली आला. (Beed Boy Bike Saved )

बीड : एक चिमुकला अचानक धावत रस्ता ओलांडू लागला आणि दुचाकीस्वार भांबावल्याने आपल्या मार्गाने जाणारी बाईक अनियंत्रित होऊन त्याच्या अंगावरुन गेली. हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना बीड जिल्ह्यातील मादळमोही गावात घडली. सुदैवाने या चिमुकल्याला कुठलीही इजा झाली नाही. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. (Beed Boy Crosses road to hit running Bike Saved Miraculously)‘देव तारी त्याला कोण मारी’ ही उक्ती बीडमध्ये सत्यात उतरली आहे. मादळमोही गावच्या सुरेश भोपळे यांचा दोन वर्षांचा मुलगा आयुष भोपळे अपघातातून बालंबाल बचावला. 3 एप्रिलच्या सकाळी आयुषसोबत जी घटना घडली, ती पाहून कोणाच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.


नेमकं काय घडलं?

आयुष सकाळी नऊ वाजताच्या सुमारास आपल्या आजीसोबत घराच्या बाहेर उभा होता. त्यावेळी खाऊ आणण्यासाठी त्याच्या आजीने त्याला पैसे दिले. पैसे मिळताच त्याने दुकानात जाण्यासाठी धूम ठोकली. मात्र रस्ता ओलांडताना आजूबाजूच्या वाहनांकडे पाहण्याचे भान चिमुकल्याकडे नव्हते. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीच्या अचानक तो समोर गेला. आयुषला बाईकची जोरदार धडक बसली आणि तो जवळपास बाईकखाली आला.बाईक अंगावरुन गेल्यानंतरही आयुष ताडकन उभा

अंगावरुन बाईकचे दोन्ही टायर जाऊनही त्याला कुठलीही मोठी दुखापत झाली नाही. एवढंच नाही, तर बाईक अंगावरुन गेल्यानंतरही आयुष ताडकन उभा राहिला. त्यानंतर त्याला गावातल्याच एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला कुठलीही मोठी इजा झाली नसल्याचं सांगितल्याने कुटुंबियांनाही मोठा दिलासा मिळाला.


आयुष सोबत घडलेली घटना हृदयाचा थरकाप उडवून देणारी आहे. आयुषचं नशीब बलवत्तर म्हणून त्याच्या प्राणांवर बेतलं नाही. मात्र रस्त्याने जाताना पालकांनी आपल्या चिमुकल्यांचे हात सोडू नयेत, हे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले. (Beed Boy Crosses road to hit running Bike Saved Miraculously)


पाहा व्हिडीओ:
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area