मुलांना सांभाळा, बीडमध्ये तीन मित्रांनी गमावला जीव, वाचा काय घडलं?

 बीडमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. Beed three boys died due to drown in water
बीड: शहरापासून जवळ असलेल्या पांगरबावडी शिवारात पोहायला गेलेल्या तीन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तिघे मित्र शुक्रवारी सांयकाळी पोहण्यासाठी खदानीमध्ये गेले होते. मात्र, तिघाचांही बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलांसह पालकांनी अशा घटना रोखण्यासाठी जागरुक होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ( Beed three boys died due to drown in water at Pangarbavadi)

तिघेही जिवलग मित्र

पांगरबावडी शिवारात पोहण्यासाठी गेलेल्या तीन जिवलग मित्रांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. ओम जाधव, मयूर गायकवाड, श्याम देशमुख अशी मृत मुलांची नावे आहेत. हे तिघेही बीड शहरातील गांधीनगर भागातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

आई वडिलांना एकुलते एक

ओम जाधव, मयूर गायकवाड, श्याम देशमुख हे तिघांच्या मृत्यूमुळं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण, तिघेही त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक मुलगे होते. ही घटना बीड शहरपासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात घडलीय. बीड तालुक्यातील पांगरबावडी शिवारातील बायपासनगरी येथील खदाणीत तिघे पोहण्यासाठी गेले होते. याप्रकरणी पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करीत आहेत.


पालकांनी मुलांची काळजी घेण्याची गरज

उन्हाळा आल्यानंतर ग्रामीण भागात मुलं पोहायला जातात. यामध्ये काहीवेळा ज्यांना पोहायाला येत नाही ती मुलं देखील पोहायला जातात. पोहायला येत नसतानाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षी समोर येतात. मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू होऊ नये यासाठी पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area