“…झेपत नसेल तर पद सोडा”, चंद्रकांत पाटलांची अजित पवारांवर टीका

 अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. करोनाच्या संकटकाळात अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचाकला आहे. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“करोनाचं वाढचं प्रमाण रोखण्यासाठी लोकांचं बाहेर फिरणं, एकमेकांना भेटणं बंद केलं पाहिजे. लॉकडाउनची गरज आहे हे योग्य असलं तरी त्यानंतर लोकांचे जे हाल होणार आहे त्याची काळजी करायची की नाही. तुटपुंज पॅकेज द्यायचं आणि तेदेखील अजून हातात पडलेलं नाही,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.


“रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची पूर्ण व्यवस्था केल्याशिवाय लॉकडाउन करुन काय करणार आहात? पुण्यातील १० रुग्णालयांना ऑक्सिजन नसल्याने रुग्णांना हलवावं लागलं. अजित पवारांनी आता सर्व सोडून पुण्यात येऊन बसलं पाहिजे. पालकमंत्री २४ तास छडी घेऊन बसला पाहिजे. काही पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात ४० हजार रेमडेसिवीर नेत आहेत आणि पुणे शहराला फक्त ७००….अजित पवारांच्या प्रतिमेच्या दृष्टीने हे योग्य नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 


“पुण्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं. पुणे जिल्ह्यात लक्ष घालायला त्यांना वेळ नसेल तर पुण्याचा पालकमंत्री बदला,” अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. उद्धव ठाकरेंनी सर्व पालकमंत्र्यांना आपल्या जिल्ह्यातून अजिबात हलू नका असं सांगितलं पाहिजे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area