‘फडणवीसांनी फालतू राजकारण सोडावे; तुमच्यामुळे जनतेला दुष्परिणाम भोगावे लागतील’

 देशातील दहा जिल्हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत. | Devendra Fadnavis Shivsenaमुंबई: राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि तत्सम उपाययोजनांना विरोध करणाऱ्या भाजपवर शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे. लॉकडाऊन केले तर आम्ही रस्त्यावर उतरू, तांडव करू, असा इशारा भाजपचे (BJP) नेते देत आहेत. मात्र, विरोधी पक्षाच्या या तांडवामुळे दुष्परिणाम हे जनतेलाच भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. (Shivsena slams BJP leader Devendra Fadnavis over politicizing Coronavirus situation in Maharashtra)


जनतेला लॉकडाऊन नको असेल तर लोकांनी बेदरकारपणे जगणे सोडले पाहिजे. कामधंदा, रोजगार, शिक्षण, नाटक, सिनेमा, पर्यटनाचा आनंद सगळ्यांनाच हवा आहे. पण हे सर्व कधी शक्य आहे? जोपर्यंत कुडीत प्राण आहे तोपर्यंत. त्यामुळे लोकांनी आधी जीव वाचवावा, असा सल्ला शिवसेनेच्या मुखपत्रातून देण्यात आला आहे.


‘देवेंद्र फडणवीसांनी फालतू राजकारण सोडावे’

आम्हाला काय कोणाची भीती? कोरोना आम्हाला स्पर्श करणार नाही, या फाजील आत्मविश्वासाच्या मानसिकतेमधून कोरोना वाढत गेला. कोरोनासंदर्भात सबुरीचे सल्ले देणारे या बेफिकिरी मंडळींना दुश्मन वाटू लागतात. देशातील दहा जिल्हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत.


राज्यात सर्वाधिक मृत्यू हे नागपुरात होत आहेत. मंगळवारी एकट्या नागपुरात कोरोनामुळे 54 रुग्णांनी जीव गमावला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी फालतू राजकारण करायचे सोडून द्यायला हवे. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचवायला पाहिजेत, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.


सरकारला टाळेबंदी करुन लोकांना घरी बसवण्याचा छंद नाही

राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही, असे सरसकट सगळ्यांचे मत आहे. लॉकडाऊन नकोच असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सांगत आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांचा रोजगार बुडत असल्याने सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करावेत, असा पर्याय पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवला आहे. प्रत्येकाचे म्हणणे आपापल्या पातळीवर योग्य आहे.


मात्र, कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. मुंबईत दररोजन पाच-सहा हजार नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. इस्पितळे भरली आहेत व रुग्णांसाठी खाट नाहीत. हे चित्र राज्याला परवडणारे आहे का, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area