कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळेच बँकेची चौफेर प्रगती – आमदार श्री प्रकाश आवाडे

 


इचलकरंजी :नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेचे सभासद, ठेवीदार व कर्जदार ग्राहक यांचे बहमूल्य सहकार्य व विश्‍वास यामुळे आजच्या आर्थिक टंचाईच्या काळातही बँकेचा मार्च 2021 अखेर एकूण व्यवसाय रु. 3822 कोटी इतका झाला. यामध्ये ठेवी रु. 2291 कोटी व रु. 1530 कोटींची कर्जे आहेत. भागभांडवल रु. 61.25 कोटी इतके आहे. तसेच या आर्थिक वर्षात तरतूदीपूर्वीचा नफा रु. 33 कोटी इतका झाला असल्याचे बँकेचे चेअरमन व आमदार श्री प्रकाश आवाडे यांनी जाहीर केले. माजी खासदार व बँकेचे संस्थापक चेअरमन श्री कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांनी वेळोवेळी दिलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळेच बँक आज चौफेर प्रगती करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी या प्रसंगी काढले.

मागील आर्थिक वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे जागतिक आणि देशांतर्गत उद्योग, व्यापार, सेवा यासारख्या प्रत्येक क्षेत्रात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे थकीत कर्जे वसुलीवर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी, बँकेच्या एनपीएमध्ये समाधानकारक वसुली झालेली नाही. रिझर्व्ह बँकेच्या नवीन पत धोरणानुसार काही स्टॅडर्ड खाती रिस्ट्रक्चर करावी लागली व कर्जदारांना रिस्ट्रक्चरचा लाभ देणेत आला. त्या रिस्ट्रक्चर कर्ज खात्यावरती नियमाप्रमाणे नफ्यातून आवश्यक त्या तरतदी केलेल्या आहेत. बँकेने अपेक्षित वसली करुन बँकेचा ग्रॉस एनपीए साधारण 9% राखण्यामध्ये यश प्राप्त झाले आहे, जे प्रमाण गत आर्थिक वर्षी 8.67% इतके होते. सध्याच्या बिकट आर्थिक स्थितीत बँकेच्या कर्जदार सभासदांनी थकीत कर्ज बाकी वसुलीसाठी भरघोस सहकार्य केल्यामुळे बँकेचा नफा रु. 33 कोटी इतका झालेला आहे, जो मागील वर्षी रु. 16 कोटी इतका होता.

आर्थिक वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने बँकेने शिरगुप्पी येथे शाखा स्थलांतरीत करुन सदरची शाखा कार्यान्वित केली आहे व कुंभोज येथेही शाखा स्थलांतरीत केलेली असून ती लवकरच कार्यान्वित होईल. तरी येथील जनतेने, बँक देत असलेल्या सर्व आर्थिक सोई-सुविधांचा, लाभ घ्यावा अशी विनंती बँकेचे चेअरमन श्री आवाडे यांनी केली. तसेच बँकेची स्टेशन रोड इचलकरंजी येथील नवीन प्रशासकीय इमारत लवकरच कार्यान्वित करीत असल्याची माहितीही त्यांनी या प्रसंगी दिली.

ठेवीदारांचा बँकेवर असलेली विश्‍वासार्हता, कर्जदारांनी बिकट परिस्थितीमध्येही कर्जाची वेळेत केलेली परतफेड यामुळेच बँक इच्छित प्रगती करु शकली, त्यामुळे ठेवीदार, कर्जदार, सभासद व ग्राहक यांचे बँकेचे चेअरमन श्री प्रकाश आवाडे यांनी मनःपूर्वक आभार मानले. बँकेच्या या आर्थिक वर्षाच्या प्रगतीमय वाटचालीमध्ये बँकेचे संचालक श्री स्वप्निल आवाडे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. तसेच बँकेचे व्हा. चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले, माजी चेअरमन अशोक सौंदत्तीकर, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कामत, बँकेचे पदाधिकारी, अधिकारी व सेवकांचे बहुमोल सहकार्य झाले असलेचे व्यक्त केले.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area