एसटी वाहक तरुणीच्या खूनप्रकरणी जाफ्राबाद आगारातील वाहकास पोलीस कोठडी

हत्या करण्यात आल्याची घटना अंत्रीखेडकर शिवारात १६ एप्रिल रोजी उघडकीस आली होती.अनिल भोसलेसह अन्य एकास संशयावरून ताब्यात घेतले होते.


चिखली:तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील एसटी वाहक तरुणीच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनिल अमिन भोसले (रा. देऊळगाव राजा) या जाफ्राबाद आगारातील वाहकास चिखली न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बुलडाणा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या माधुरी भीमराव मोरे या तरुणीचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अंत्रीखेडकर शिवारात १६ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तासाभरात देऊळगाव राजा येथील रहिवासी असलेल्या व जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद बस आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या अनिल भोसलेसह अन्य एकास संशयावरून ताब्यात घेतले होते. 

पोलिसांच्या चौकशीत भोसलेने माधुरी मोरेचा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दुसऱ्या संशयितास सोडून देण्यात आले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area