आजाद समाज पार्टी कोल्हापूर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी स्वाती माजगावे यांची निवड


कोल्हापूर  : भीम आर्मी चे संस्थापक एडवोकेट भाई चंद्रशेखर आजाद रावण यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पार्टी कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ स्वाती माजगांवे  यांची निवड शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथील बैठकीत करण्यात आली .

या निवडीचे पत्र आजाद समाज पार्टी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संतोष आठवले यांच्या हस्ते देण्यात आले .

 छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा जोतीराव फुले ,छत्रपती शाहू महाराज डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि मान्यवर काशीराम साहेब यांचे मिशन पुढे घेऊन जाण्यासाठी आजाद समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले  आहे .आझाद समाज पार्टीला संघटनात्मक दृष्ट्या अधिक बळकटी देऊन आपल्यावर दिलेली जबाबदारी पूर्णपणे निष्ठेने आणी प्रामाणिकपणे पार पाडणार याचा विश्वास सुद्धा या पत्रकात दिला आहे

 यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीनिवास लाड व फिरोज मुजावर यांची ही निवड करण्यात आली जिल्हा महासचिव सूर्यकांत देशमुख समीर विजापुरे इम्रान खान पठाण सदाशिव कांबळे सौ दिपाली कळंत्रे आदीच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area