बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोना

 अक्षयनं त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन कोरोना झाल्याची माहिती शेअर केली आहे.
मुंबई: बॉलीवूडमधील मातब्बर कलाकारांना कोरोनाची होणारी लागण चाहत्यांची भीती वाढवत आहे. एकापाठोपाठ अनेक कलाकारांना कोरोना झाला आहे. त्यांनी आपआपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांनी काळजी घ्यावी असे आवाहनही यावेळी त्यांच्याकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता कहर कमालीचा धोकादायक ठरत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे बॉलीवूड आर्थिक संकटात सापडले असताना दुसरीकडे आता कुठे समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढल्यानं सर्वांच्या अ़डचणीत वाढ झाली आहे. आता बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमारला कोरोना झाल्याची माहिती पुढे आली आहे.  


अक्षयनं त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन कोरोना झाल्याची माहिती शेअर केली आहे. देशात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यात बॉलीवूडमध्येही कोरोनानं शिरकाव केला आहे. बॉलीवूडमध्ये खतरो के खिलाडी म्हणून प्रसिध्द असणा-या अक्षय़ला कोरोना झाल्यानं त्याच्या फॅन्सनं चिंता व्यक्त केली आहे. आता अक्षयनं स्वतला घरीच क्वॉरंनटाईन करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी अक्षय़नं कोरोनाची टेस्ट करुन घेतली होती. त्यात ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्याची डोकेदुखी वाढल्याचे पाहवयास मिळाले आहे. रविवारी सकाळी अक्षयनं सोशल मीड़ियावर ही माहिती पोस्ट केली. त्यानंतर त्यानं फॅन्सला आवाहन केलं आहे की त्यांनी कोरोना होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area