ST कंडक्टर तरुणीच्या अंगावर चटके, खून करुन माळरानावर फेकलं, डेपो हादरला

 मॉर्निंग वॉकला निघालेल्या ग्रामस्‍थांना अंत्री खेडेकर आणि मेरा खुर्द परिसरात 25 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेचे नाव माधुरी मोरे (25) असून त्या घटस्‍फोटित असल्याचे सांगण्यात येत आहे. (buldhana bus conductor women murder)
बुलडाणा : चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर परिसरात हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकला निघालेल्या ग्रामस्‍थांना अंत्री खेडेकर आणि मेरा खुर्द परिसरात 25 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेचे नाव माधुरी मोरे (25) असून त्या घटस्‍फोटित असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह आणि मृतदेहाशेजारील परिसरातील स्थिती पाहता या महिलेचा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या महिलेच्या अंगावर चटके देण्यात आले होते. तसेच गळा चिरून या महिलेचा मृतदेह माळरानावर फेकण्यात आला होता.  (Buldhana 25 year old bus conductor women Madhuri More murdered police finding suspect)

सुट्टी असल्यामुळे महिला आपल्या मावशीकडे आली होती

मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला या बुलडाणा जिल्ह्याच्या अंत्री खेडेकर येथील आहेत. या एक बस कंडक्टर असून बुलडाणा आगारात कार्यरत होत्या. परवा (14 एप्रिल) त्‍यांचे वडिलांशी शेवटचे बोलणे झाले होते. त्‍यानुसार माधुरी मोरे या साखळी येथे मावशीच्‍या घरी गेल्या होत्या. काल (15 एप्रिल) नोकरी करुन त्या आठवडी सुट्टी असल्याने अंत्री खेडेकरला घरी परतणार होत्‍या. मात्र, आज (16
एप्रिल) अंत्री खेडेकरच्‍या शिवारात आढळला त्यांचा थेट मृतदेह आढळला.
तरुणीचा गळा चिरलेला, अंगावर चटके

प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा गळा चिरण्यात आलेला होता. तसेच, त्यांच्या हातापायावर चाकूचे वार आणि त्यांच्या अंगावर चटकेसुद्धा दिलेले होते. या सर्वाचे वृण त्यांच्या अंगावर दिसत होते. ही परिस्थिती पाहता मोरे यांचा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपीचा शोध सुरु

दरम्यान, मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना या महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना सांगितले. या घटनेची माहिती होताच अंढेरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून उत्तरीय चाचणीचा अहवाल आल्यानंतरच गोष्टी स्पष्ट होतील, असे सांगण्यात आले आहे. सध्या या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area