अनेकदा भाऊ कदम ‘स्क्रिप्ट विसरलो’ किंवा ‘स्क्रिप्ट पाठांतर नाही’, असं म्हणत पंच काढतात, आणि प्रेक्षकही विनोद समजून त्यावर खळखळून हसतात. मात्र, भाऊ कदम खरंच स्क्रिप्ट कसे पाठ करतात, हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का?
अनेकदा भाऊ कदम ‘स्क्रिप्ट विसरलो’ किंवा ‘स्क्रिप्ट पाठांतर नाही’, असं म्हणत पंच काढतात, आणि प्रेक्षकही विनोद समजून त्यावर खळखळून हसतात. मात्र, भाऊ कदम खरंच स्क्रिप्ट कसे पाठ करतात, हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? मग कुशल बद्रिकेने (Kushal Badrike) शेअर केलेला हा धमाल व्हिडीओ पाहा.
पाहा कुशलचा व्हिडीओ :
भाऊ ऑफस्क्रिन स्कीटच्या तयारीसाठी पाठांतर कसे करतात, हे या व्हिडीओत पाहायला मिळते आहे. हा मजेशीर व्हिडीओ कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
या व्हिडीओत भाऊ कदम स्क्रिप्ट वाचताना झोपलेले पाहायला मिळतायत. तर, भाऊला झोपलेले पाहुन कुशल त्यांना त्यांना विचारतो, ‘भाऊ झोपत का नाहीस आरामात?’ हे विचारताच ‘नाही रे, पाठांतर करतोय’, असे उत्तर देत भाऊ कदम पुन्हा झोपी जातात. या गंमतीचा कुशलने एक व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत कुशल पोस्टमध्ये गमतीत लिहीतो की, ‘भाऊ कदम यांच पाठांतर चालू आहे, सगळ्यांनी शांत रहा’. या व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स पाऊस पडत आहे (Chala Hava Yeu Dya fame Kushal Badrike share bhau kadam script reading video).
कुशल आणि भाऊचे खास नाते!
‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून कुशल बद्रिके आणि भाऊ कदमची जोडी नेहमीच सर्वांना खळखळून हसवते. कधी सीआयडीमधले इन्स्पेक्टर बनून, बनून तर कधी सासू-सूना बनून या जोडीने धम्माल उडवून दिली आहे. या लाडक्या जोडीतील कुशलने काही दिवसांपूर्वी भाऊच्या वाढदिवसानिमित्त फोटो आणि एक छानशी पोस्ट लिहित लाडक्या दोस्ताला खास शुभेच्छा दिल्या होत्या. ‘सलामत रहे दोस्ताना हमारा’ म्हणत कुशलने भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.