अमरावती: माजी कृषी मंत्री डाॅ. बोंडे यांचे राजापेठ येथील हायटेक स्पेशलिस्ट हाॅस्पीटल विरोधात किरण गुडधे यांनी आज दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजी राजापेठ पोलिस स्टेशन अमरावती येथे लेखी तक्रार देवून कठोर कार्यवाही ची मागणी केली आहे.
ICMR व WHO च्या निर्देशानुसार मान्यताप्राप्त कोवीड सेंटर मध्येच कोवीड १९ च्या पेशंट चा उपचार करणे अनिवार्य आहे. असे असतांना सुद्धा डाॅ. बोंडे हाॅस्पिटल ने नियम धाब्यावर ठेवून कोवीड रुग्णांचा उपचार सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल पंजाबराव तंतरपाडे यांचा मृत्यु झाला तेव्हा तब्बल आठ तास उलटल्यावरही मृतदेह नातेवाईकांना ताब्यात दिला नव्हता तेव्हा ही बातमी भीम सैनिकांना मिळाल्या बरोबर रुग्णालयात धाव घेतली व तेथील डाॅ. अनिल देशमुख यांना खडे बोल सुनावले. डाॅक्टर चे म्हणणे होते की शिल्लक रक्कम जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात देत नाही.
रुग्णालयातील कागदपत्र ची पाहणी केली असता असे दिसले की, मृत व्यक्ति दि ३ एप्रिल २०२१ ला भर्ती झाला. ५ एप्रिल रोजी कोवीड पोझीटीव आल्यावर कोवीड सेंटर मध्ये रेफर न करता तीथेच त्यांच्यावर उपचार सुरु केला व त्यातच त्यांचा मृत्यु झाला. जवळपास ३ लाखाच्या औषधाव्यतिरीक्त पावनेचार लाख बील हाॅस्पिटल ने काढले. हा अनागोंधी प्रकार लक्षात येता कायदेशीर कार्यवाही व्हावी या करीता आज राजापेठ पोलिस स्टेशन ला लेखी तक्रार देण्यात आली आहे. उद्या हा सगळा प्रकार कलेक्टर व जिल्हा शल्यचिकित्सक या़च्यासमोर ठेवुन जिल्हा प्रशासन कोणती कार्यवाही करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. डॉ. बोंडे हाॅस्पीटल ची मान्यता रद्द करण्यासाठी मागणी ही जनते द्वारा केली जात आहे. लेखी तक्रार देतांना अँड. सिद्धार्थ गायकवाड, सुरेश तायडे, मालाधरे, मंगेश कनेरकर, सनी गोंडाणे व किरण गुडधे उपस्थित होते.