Sachin Vaze: सचिन वाझे 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत; तळोजात सुरक्षित सेलची केली मागणी

 तब्बल 27 दिवस एनआयएच्या कोठडीत असलेले निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Court sends Sachin Waze to judicial custody till April 23)
मुंबई: तब्बल 27 दिवस एनआयएच्या कोठडीत असलेले निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना काहीसा दिलासा मिळाला आहे. वाझेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 23 एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालीयन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष एनआयए कोर्टाने दिले आहेत. (Court sends Sachin Waze to judicial custody till April 23)


अँटालिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. त्यांना सलग दोन दिवसांच्या कसून चौकशी नंतर 14 मार्च रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना एनआयच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. ते तब्बल 27 दिवस एनआयएच्या कोठडीत होते. आज त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्यांना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाझेंसाठी हा मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे.


सुरक्षित सेलची मागणी

दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर वाझेंच्या वकिलाने वाझेंसाठी कोर्टाकडे तुरुंगात सुरक्षित सेल देण्याची मागणी केली आहे. सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टीने हा सेल देण्यात यावा, असं वाझेंच्या वकिलाने म्हटलं आहे. तर, वाझेंची तळोजा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.सीबीआयने कोर्टात आज एक अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी आणि इतर कागदपत्रं आदी पुराव्यांचा तपास करायचा असून या तपासाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. कोर्टाने ही विनंती मान्य केली आहे. सीबीआयला ज्या काही दस्ताऐवजांची गरज आहे, ती देण्यात यावीत, असे आदेश कोर्टाने एनआयएला दिले आहेत.


वाझेंचे पत्रं लीक, एनआयएचा आक्षेप

दरम्यान, वाझेंचं पत्रं मीडियात लीक झाल्याबद्दल एनआयएने जोरदार आक्षेप घेतला. वाझे कस्टडीत असताना त्यांचं पत्रं लीक झालंच कसं? असा सवाल एनआयएने केला. त्याबाबत कोर्टाने वाझेंच्या वकिलांना विचारणा केली असता मला यातलं काहीच माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. लेटर कसं बाहेर आलं हे मला माहीत नाही. या प्रकरणात मी सहभागी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर असा प्रकार पुन्हा घडता कामा नये, अशी सक्त ताकीद न्यायाधीशांनी दिली. वाझेंच्या आरोग्याविषयीची माहितीही कोर्टाकडून विचारली गेली. त्यावर वाझे फिट आहेत. त्यांना सध्या उपचाराची गरज नाही, असं एनआयएकडून सांगण्यात आलं. (Court sends Sachin Waze to judicial custody till April 23)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area