आधी दानिश चिकनाला अटक, आता राजिक चिकनाला NCB चे समन्स, दाऊदच्या हस्तकांवर कारवाईसत्र

 दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश चिकना याला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली होती (Dawood Ibrahim aide Raziq Chikna )
मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि डी कंपनीच्या निकटचा राजिक चिकना (Raziq Chikna ) याला एनसीबीने समन्स पाठवले आहे. राजिक चिकनाला हजर राहण्याचे आदेश नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दिले आहेत. राजिक चिकनाचा भाऊ दानिश चिकना (Danish Chikna) याला काही दिवसांपूर्वी राजस्थानातून अटक करण्यात आली होती. दानिश दाऊदची ड्रग्ज फॅक्टर चालवत असल्याचं उघड झालं आहे. (Dawood Ibrahim aide Raziq Chikna summoned by NCB)दानिश चिकनाला राजस्थानात अटक

दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली होती. दानिश चिकना याच्याकडे काही प्रमाणात ड्रग्ज सापडल्याची माहिती आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाने दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या दानिशच्या ड्रग्जची फॅक्टरीवर छापा टाकला होता. मात्र छापेमारीपूर्वीच निसटण्यात दानिश चिकना यशस्वी झाला होता. तेव्हापासूनच एनसीबी त्याच्या मागावर होती. अखेर राजस्थान पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद करुन मुंबईला आणले.एनसीबीच्या दोन गुन्ह्यात फरार

अनेक केसेसमध्ये फरार असलेल्या दानिशवर कारवाई करण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. डोंगरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर जवळपास सहा गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हत्येचा प्रयत्न यासारख्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे. तर एनसीबीच्या दोन गुन्ह्यात तो फरार होता.


एजाझ खानलाही एनसीबीची अटक

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेता एजाझ खान (Ajaz Khan) यालाही अटक केली आहे. 30 मार्चला एजाझ राजस्थानहून मुंबईला परत आला असता, एनसीबीने त्याला ताब्यात घेतले होते. एनसीबी टीमने एजाझच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथील अनेक ठिकाणी छापे टाकले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area