दाऊदच्या रत्नागिरीतील प्रॉपर्टीची मोजणी, नव्या मालकाने सांगितलं जमिनीचा वापर कसा करणार

 साफेमाच्या (स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सी) अधिकाऱ्यांच्या उपस्थित जमिनीची मोजणी होत आहे. (Dawood Ibrahim Ratnagiri Mumbke Property)
रत्नागिरी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मुंबके गावातील मालमत्ता लिलावानंतरची प्रक्रिया सुरु झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या जमिनीच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मालमत्तेचे नवे मालक वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी जागेचा वापर कसा करणार, याचा मानसही बोलून दाखवला. (Dawood Ibrahim Konkan Ratnagiri Mumbke Property bought by Delhi Lawyer)


साफेमाच्या (स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सी) अधिकाऱ्यांच्या उपस्थित जमिनीची मोजणी होत आहे. भूमी अभिलेख विभागाने ही मोजणी सुरु केली. जमिन मोजणीची प्रकिया आणखी दोन दिवस चालणार आहे. लिलावात मालमत्ता विकत घेतलेले वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज या मोजणीसाठी मुंबके गावात दाखल झाले आहेत.


दहशतवाद विरोध पथकाचे उपक्रम राबवणार

भारद्वाज यांनी लिलावात विकत घेतलेल्या जागेची पाहणी केली. प्रत्यक्ष मोजणीच्या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली. जमिन नावावर करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे या मालमत्तेचा उपयोग दहशतवाद विरोध पथकासारखे उपक्रम राबवण्यासाठी करण्याचा मानस भूपेंद्रकुमार यांनी बोलून दाखवला.


दाऊदच्या मालमत्तेची विक्री कितीला

दिल्लीच्या दोन वकिलांनी दाऊदच्या सहा मालमत्ता घेतल्या आहेत. यामधून सरकारला 22 लाख 79 हजार 600 रुपये मिळाले आहेत. वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या दोन मालमत्ता तर वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी सहा मालमत्ता घेतल्या आहेत.  तर दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या 11 लाख 20 हजार रुपयांना विकण्यात आली आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area