पुण्यातील वानवडीमध्ये डॉक्टरला मारहाण

करोना निदान झालेल्या रुग्णाला चांगले उपचार दिले नसल्याचा आरोप करून डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याची घटना वानवडी भागात घडली. या प्रकरणी चौघांना वानवडी पोलिसांनी अटक केली.


पुणे : करोना निदान झालेल्या रुग्णाला चांगले उपचार दिले नसल्याचा आरोप करून डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याची घटना वानवडी भागात घडली. या प्रकरणी चौघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. कोर्टाने चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.


असिफ कादीर शेख (वय ३३), जैद जुनेद घोडके (वय २०), अश्फाक आफताब फराश (वय २२), अजिंक्य दत्तात्रय भांगे (वय २८, चौघे रा. कोंढवा) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत डॉ. सोहेल खान (वय ३७, रा. कोंढवा) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. खान यांचे कोंढवा भागात हॉस्पिटल आहे. आरोपींनी त्यांच्या नातेवाइकाला तेथे दाखल केले होते. डॉ. खान यांनी करोना निदान चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर चाचणीत रुग्ण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्या ठिकाणी रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले होते, तसेच त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे रुग्णाला पाहण्यासाठी स्वतः डॉक्टर गेले. त्या वेळी प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आढळून आले. त्याची त्याची डॉक्टरांनी नातेवाइकांना दिली. पण, आरोपींनी प्रकृती कशी बिघडली, असे विचारून डॉ. खान यांना मारहाण केली.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area