कोरोना संक्रमणाचा तिसरा टप्पा सुरु झाल्याने रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे, त्यासाठी ह्यब्रेक द चेनह्ण अतर्गत लॉकडाऊन पुकारला आहे. त्यातून अत्यावश्यक सेवेला वगळले असले तरीही नागरीकांना जिल्हा प्रवेश बंदी (No entry) व फिरण्यावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. पर जिल्ह्यातून येणार्या व जिल्हाबाहेर जाणाऱ्या नागरीकांवर प्रतिबंध करण्यात आला आहे.
तालुका प्रवेशाला बंदी
जिल्ह्यातील एका तालुक्यातून दुसर्या तालुक्यात जाण्यावर प्रतिबंध राहणार आहे. त्यासाठी तालुका तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी तसेच प्रमुख रस्त्यावर ग्रामीण व्यक्तीला येण्यासही प्रतिबंध केले आहे. त्या ठिकाणी कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
एक किमी अंतराबाहेर कारवाई
नागरीकांना अत्यावश्यक सुविधा (Essential facility) ह्या एक किमी अंतरापर्यत उपलब्ध आहेत. त्याच्या कारणांस्तर एखादा व्यक्ती एक किमी अंतराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्या रहीवाशी ठिकाणाची शहानीशी करुन त्याच्यावर वाहन जप्ती, दंड, गुन्हे दाखल व जागीच ॲन्टीजेन चाचणीची कारवाई करण्यात येणार आहे.
आता इव्हिनिंग वॉकवरही कारवाई
पोलीस खात्यामार्फत रोज मॉर्निग वॉक साठी बाहेर पडलेल्यावर कारवाई सुरु आहे. पण आता ह्यइव्हिनिंग वॉकह्ण साठी घराबाहेर बाहेर पडलेल्या सर्वावरच कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरीकांनी सायंकाळी अगर रात्री उशीराही बाहेर फिरु नये असे आवाहन पोलीस खात्यामार्फत केले आहे.
कोल्हापूर, इचलकरंजी शहरावर विशेष लक्ष
कोल्हापूर शहरात नऊ तर इचलकरंजी शहरात सहा ठिकाणी कायम पोलिसांची नाकाबंदी राहणार आहे. त्याशिवाय बाजारपेठा, भाजी मार्केटच्या बाहेर पोलीसांची तपासणी पथके ठेवण्यात येत आहे. येथे वस्तू खरेदीसाठी येणारा एक किमी अंतरापेक्षा जादा दूरवरुन आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.