इचलकरंजी: शहरातील लालनगरातील कोरोना लसीकरण (corona vaccine) केंद्रावर बुधवारी सकाळी लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी मी पुढे की तु पुढे यावरुन नागरिकांच्यात मोठा वाद होवून गोँधळ उडाला.
या घटनेची माहिती समजताच गावभाग पोलिसांनी तात्काळ लसीकरण (corona vaccine)केंद्रावर धाव घेतली. त्यामध्ये हस्तक्षेप करीत नागरिकांना शांत केल्याने अनुचित प्रकार टळला. तसेच पोलिसांनी सोशल डिटेन्शन ठेवत लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची रांग लावली. त्यांनतर या केंद्रावर पोलीस बंदोबस्तात लसीकरणास सुरुवात झाली.