इचलकरंजीत नागरिक रस्त्यावर आले आणि प्रशासन झोपी गेले

 


इचलकरंजी: राज्यात काल रात्री पासून कडक निर्बंधाची घोषणा केली असताना इचलकरंजी शहरात मात्र खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे शासनाच्या कडक निर्बंधांच्या उपाययोजनेला नागरिकांनी हरताळ फासला असून सोशल डिस्टन्सिंगचा (social distancing) फज्जा उडाल्याचे सध्या चित्र आहे. शहरात नागरिकांनी गर्दी केली असताना पालिका आणि पोलिस प्रशासन यांचे दुर्लक्ष शहरासाठी मोठ्या संकटाचे निमंत्रण आहे.

राज्यभरात ऑक्सिजन, बेड आणि रेमडेसिवीरचा तुडवडा जाणवू लागल्यामुळे भितीचे वातावरणात असताना इचलकरंजी शहरात मात्र नागरिकांनी लाॅकडाऊनचे नियम अक्षरशः पायदळी तुडवत बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली आहे. शहरातील बाजारपेठा गर्दीमुळे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नागरिक रस्त्यावर आले आणि प्रशासन झोपी गेले, अशी काहीशी विचित्र परिस्थिती दिसत आहे.


कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे.  इचलकरंजी शहरात मात्र खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. शासनाच्या कडक निर्बंधांच्या उपाययोजनेला नागरिकांनी हरताळ फासला असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे सध्या चित्र आहे. शहरात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली असताना पालिका आणि पोलिस प्रशासन यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. 


येथील वडगांव बाजार समिती व राधा- कृष्ण टॉकीज परिसरात झालेल्या गर्दीकडे (social distancing) पोलीस व पालिकेचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. पोलिस प्रशासन इतकी सतर्क असताना असला गाफिल पणा घड़लाच कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे,  की पोलिस प्रशासन फक्त येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या अडवून पावती करण्यात व्यस्त आहेत?


शहरात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असताना प्रशासन झोपेचे सोंग का घेत आहे ? नागरिक लाॅकडाऊनचे नियम पाळणार आहेत की नाही? पोलिस प्रशासन इतकी सतर्क असताना असला गाफिल पणा घड़लाच कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. की, पोलिस प्रशासन फक्त येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या अडवून पावती करण्यात व्यस्त आहेत? असे प्रश्न नागरिकांतून विचारले जात आहेत.  (local news)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area