इचलकरंजीत आठवडी बाजार बंद; आणखी एक कोविड केंद्र


इचलकरंजी दुसऱ्या लाटेत शहरासह परिसरातही कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना व सुविधांची उपलब्धता करण्यासंदर्भात बुधवारी नगरपालिकेच्या सभागृहात समितीची बैठक (Meeting) झाली. बैठकीच्या सुरुवातीला ‘आयजीएम’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. आर. शेट्ये यांनी रुग्णालयातील सद्य:स्थितीची माहिती दिली. तसेच शहरात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या एक लाख ५ हजार इतकी असून, आजअखेर ३० हजार जणांनी लस घेतली असल्याचे सांगितले.
प्रत्येक शंभर व्यक्तीमागे १५ जण पॉझिटिव्ह (Positive) येत असल्याने पुढील तरतूद म्हणून तात्यासाहेब मुसळे हायस्कूल येथे १२० बेडचे कोविड केअर केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यंकटेश्वरा केंद्रात सध्या १७६ बेड असून, त्यामध्ये १२ ऑक्सिजन बेड आहेत. तेथे सध्या १३९ रुग्ण दाखल आहेत. त्याची क्षमता २२५ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. भाजीपाला विक्रीसाठी आठवडी बाजार बंद राहणार असून, पालिकेच्या नियोजित जागेवर पट्टे आखून देण्यात येणार आहेत.

अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची रस्त्यातच तपासणी केली जाणार आहे, आदी निर्णय घेण्यात आले. बैठकीस (Meeting) प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक राहुल खंजिरे, सुनील पाटील, विठ्ठल चोपडे, प्रकाश मोरबाळे, उपमुख्याधिकारी केतन गुजर, विश्वास हेगडे, आदी उपस्थित होते.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area