SBI मध्ये जनधन खाते असल्यास बँककडून मिळतेय 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या…

 प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत देशभरात कोट्यवधी लोकांनी खाती उघडली. तुमचं जनधन खाते कोणत्या बँकेत आहे?. SBI Jandhan accountनवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (State Bank Of India) ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवते. स्टेट बँक वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देत ​​राहते. प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत देशभरात कोट्यवधी लोकांनी खाती उघडली. तुमचं जनधन खाते कोणत्या बँकेत आहे? जर तुम्ही एसबीआयमध्ये जन धन खाते उघडले असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. (If you have Jandhan account in SBI, you can get 2 lakh facility from the bank)

जनधन खातेदारांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ

एसबीआय आपल्या जनधन खातेदारांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देत आहे. ट्विटद्वारे बँकेने आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती दिली. एसबीआय रूपे जनधन कार्ड एसबीआयद्वारे जन धन खातेदारांना प्रदान केले जाते. या कार्डवर ग्राहकांना दोन लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण देण्याची सुविधा दिली जात आहे. रूपे कार्ड आपल्या एटीएमप्रमाणे कार्य करते. याच्या मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदीही करू शकता.


आपण रुपे कार्डसाठी अर्ज करू शकता?

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सांगितले आहे की, जर तुम्ही एसबीआय रुपे जनधन कार्डसाठी अर्ज केला तर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळेल. रुपे कार्डची सुविधा बँकेमार्फत ग्राहकांना मोफत दिली जाते. आपण हे कार्ड एटीएम कार्ड म्हणून वापरू शकता. आपण एटीएममधून पैसे काढू शकता, खरेदी देखील करू शकता.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area