धक्कादायक! पोलिसाच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; सप्तकनगरमधील थरारक घटना

 घराला आग लावून पोलिसाच्या कुटुबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही थरारक घटना एसआरपीएफ कॅम्पजवळील ज्ञानदीप कॉलनीलगतच्या सप्तकनगर येथे मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांचे कुटुंबीय दहशतीत आहे.नागपूर: घराला आग लावून पोलिसाच्या कुटुबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही थरारक घटना एसआरपीएफ कॅम्पजवळील ज्ञानदीप कॉलनीलगतच्या सप्तकनगर येथे मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांचे कुटुंबीय दहशतीत आहे. (in nagpur an attempt was made to burn the family of a policeman alive)राहुल चव्हाण हे पोलिस मुख्यालयात कार्यरत असून, सध्या ते वानाडोंगरीतील आयटीआय कोव्हिड सेंटर येथे तैनात आहे. सोमवारी रात्री राहुल हे कोव्हिड सेंटर येथे गेले. राहुल हे कोव्हिड सेंटरवर गेल्यानंतर घरी त्यांच्या पत्नी पुनम , मोठा मुलगा राघव (वय ६) लहान मुलगा केशव (वय ३) हे घरी होते.पहाटे ३ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने दरवाजाला बाहेरुन कडी लावली. दरवाजा व घरावर रॉकेल टाकून आग लावली. घरात धूर झाल्याने पुनम यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्या जाग्या झाल्या. त्या घाबरल्या. सावधगिरी बाळगत त्यांनी दोन्ही मुलांना जागे केले. दोघांना स्नानगृहात नेले. त्यानंतर त्या स्वयंपाक घरात आल्या. स्वयंपाक घरातील साहित्यही जळत होते.पुनम यांनी लगेच राहुल व शेजारी राहणारे मामा नामदेव राठोड यांच्या मोबाइलवर संपर्क साधून घराला आग लावण्यात आल्याची माहिती दिली. पुनम यांनी आग विझवायला सुरूवात केली. याचदरम्यान त्यांचे मामा तेथे पोहोचले.त्यांनी शेजाऱ्यांना जागे केले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आग विझविली. मामा यानी दरवाजा तोडला. पुनम व त्यांच्या मुलांना घराबाहेर काढले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा केला. पुनम चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area