तरुणीनं ब्रेक समजून एक्सीलेटर फिरवलं, स्कुटी घेऊन पडताच लोक म्हणाले “पापा की परी, रोड पर पड़ी”

 एका भारतीय तरुणीचा फनी व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोपेड चालवताना तरुणी गोंंधळल्यामुळे सोशल मिडीयावर हा व्हिडीओ आवडीने पाहिला जातोय. (indian girl scooty funny viral video)



मुंबई : सोशल मीडिया हे अगदीच मोठे आणि जगड्व्याळ माध्यम आहे. येथे कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी सहज गायलेल्या गाण्यामुळे कधी एखादी व्यक्ती एका क्षणामध्ये जगप्रसिद्ध होते. तर एखाद्या छोट्याशा मुलीचा ठुमके मारत असलेला डान्स नेटकऱ्यांना भलताच आवडतो. इंटरनेटवर फनी व्हिडीओसुद्धा जगभरात मोठ्या चवीने पाहिले जातात. सध्या असाच एका भारतीय तरुणीचा फनी व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोपेड चालवताना तरुणी गोंंधळल्यामुळे सोशल मिडीयावर हा व्हिडीओ आवडीने पाहिला जातोय. (Indian girl rotates scooty accelerator instead of break funny video goes viral)


व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

व्हिडीओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे एक तरुणी मोपेडला चालवण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र, यावेळी महिलेने एक्सीलेटर समजून गाडीचे चक्क एक्सीलेटर (Exilator) फिरवले. मोपेडवरील ब्रेक कोणते आणि एक्सीलेटर कोणते याविषयी व्हिडीओतील तरुणीची धांदल उडालेली दिसते आहे. एक्सीलेटर जोरात फिरवल्यामुळे तरुणी बसलेली मोपड जागेवरच फिरते आहे. त्यातही रस्त्यावर पाणी साचलेले असल्यामुळे ही मोपेड जागेवरच गोल गोल फिरताना दिसतेय. हा सर्व प्रकार पाहून एक माणूस या तरुणीच्या मदतीसाठी धावतोय. मात्र, मदत करण्याआधीच तरुणी तिची मोपेड घेऊन रसत्याच्या कडेला पडलेली दिसतेय. एखाद्या तरबेज स्टंटमॅनसारखं या महिलेची मोपेड फिरताना दिसतेय.



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area