मित्रासोबत फिरायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणीवर गँगरेप, पाच जणांना अटक

 जमशेदपूरजवळ पटमदा या पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात सोमवारी उशिरा ही घटना घडली. (Jharkhand Girl Gang Rape)
रांची : मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 25 वर्षीय तरुणीचा रस्ता अडवून पाच जणांनी तिच्यावर गँगरेप केला. झारखंडमध्ये विवाहितेवर अकरा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात जमशेदपूरमध्ये पुन्हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघड झाला आहे. (Jharkhand Jamshedpur 25 years old Girl out with Friend Gang Rape)

मित्राला मारहाण

जमशेदपूरजवळ पटमदा या पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात सोमवारी उशिरा ही घटना घडली. पीडित युवती आपल्या मित्रासोबत घरी जाण्यासाठी निघाली होती. इतक्यात पाच आरोपींनी रस्त्यात दोघांची वाट अडवली. त्यानंतर मित्राला मारहाण करुन त्यांनी पळवून लावलं. तरुणीला एका तलावाजवळ नेऊन पाचही जणांनी आळीपाळीने बलात्कार केला.

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तरुणीने कशीबशी आरोपींच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर पोलिस स्टेशन गाठून तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तातडीने पावलं उचलत सकाळ उजाडण्या आधीच पाचही आरोपींना जेरबंद केलं.


कोणाकोणाला अटक?

पोलिसांनी धनराज महतो उर्फ राज (22 वर्ष), हरि महतो (30 वर्ष), रंजीत महतो (27 वर्ष), कालू महतो (24 वर्ष) बुलेट महतो (28 वर्ष) या पाच जणांना अटक करुन न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. (Jharkhand Girl Gang Rape)


35 वर्षीय महिलेवर 11 जणांचा गँगरेप

झारखंड जिल्ह्यात अवघ्या काही दिवसांपूर्वीच वासनांधता आणि क्रूरतेचा अक्षरशः कळस पाहायला मिळाला होता. 35 वर्षीय महिलेवर तब्बल 11 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. गँगरेप करणारे आठ आरोपी कोरोनाग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. तर बलात्कार पीडितेलाही कोरोना संसर्ग झाल्याची माहिती आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area