पुन्हा एकदा ट्विट करुन तोंडघशी पडली कंगना राणावत

 


रोजच आपल्या वेगवेगळ्या ट्विटमुळे अभिनेत्री कंगना राणावत चर्चेत असते. कंगना सोशल मीडियावर बॉलिवूडमधील असो किंवा देशातील घडामोडींवर तिचे मत मांडत असते. पण कंगनाला अनेकदा परखडपणे मत मांडणे महागात पडतं. नुकतचे भाजपचे एक ट्विट (twitter post) शेअर करत देशातील राज्य सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न कंगनाने केला. पण कंगनाने केलेल्या ट्विटमुळे नेटिझन्सनी तिच्यावर पलटवार करत तिला ट्रोल केले.


देशात गेल्या आठवडाभरात ऑक्सिजन (oxygen) उपलब्ध न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता उद्रेक आणि दुसरीकडे ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे आरोग्य सुविधेचा ताण वाढत आहे. अशात भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देशात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपचे हे ट्विट शेअर करत कंगनाने एक ट्विट केले आहे. पण तिच्या या ट्विटवरून नेटकऱ्यांनी तिलाच ट्रोल केले आहे.

आपल्या या ट्विटमध्ये (twitter post) कंगना म्हणाली, देशातील काही देशद्रोही शक्ती ज्या त्यांचा वेळ संसाधन देशाला तोडण्यासाठी वाया घालवत आहेत त्या आज तुमचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून सावध रहा.


भाजपने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये मेदांता रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर नरेश त्रेहन यांनी रुग्णालयाकडे पुरेसा ऑक्सिजन साठा असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सांगितले होते. शिवाय गरज असेल तरच ऑक्सिजनचा वापर करा, असेही ते म्हणाले होते.

पण एक युजर कंगनाच्या या ट्वीटवर (twitter) म्हणाला, कृपया यांना लवकर बीजेपीचे तिकीट द्या. आता ही एखाद्याच्या मृत्यूची थट्टा करू लागली आहे. तसेच ते तर तिचे कामच आहे, ज्याची सुरुवात सुशांतच्या मृत्यूने झाली होती. तर दुसरा युजर म्हणाला आहे. घरात बसून ट्वीट करण सोपे आहे. एकदा बाहेर येऊन पहा, परिस्थिती लक्षात येईल. तुम्हाला तर जास्तच कळेल, कारण तुम्ही तर विनामास्क फिरता. कंगनाच्या या ट्वीटनंतर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area