Kangana Vs Maharashtra Government | महाराष्ट्र लॉकडाऊनवरून कंगनाचा पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा, फोटो ट्विट करत म्हणाली…

 बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. कंगना बर्‍याचदा सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारबद्दल वक्तव्य करत असते. या वेळी आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारबद्दल ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. कंगना बर्‍याचदा सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारबद्दल वक्तव्य करत असते. या वेळी आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारबद्दल ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार मुंबईतील कंगनाच्या कार्यालयातील बरेच अनधिकृत बांधकामाची तोडफोड करण्यात आली होता. ज्यानंतर अभिनेत्री सतत उद्धव सरकारवर कडक टीका करत असते. नुकतच कंगनाने ट्विट करत महाराष्ट्रातील लॉकडाऊन बद्दल सडकून टीका केली आहे (Kangana Ranaut  Vs Maharashtra Government on Lockdown).

काहीवेळा पूर्वीच कंगना रनौतने ट्विटवर एका दरवाजाचा फोटो शेअर केला आहे. हा दरवाजा समोरपासून बंद आहे. परंतु, हा दरवाजा सर्व बाजूंनी खुला आहे. हा दरवाजाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये असा आहे”. ज्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आली आहे.

‘महाराष्ट्रात कोरोनाचे प्रकरण वाढतच चालले आहेत. ज्यामुळे राज्य सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन लादला आहे. जिथे या संपूर्ण लॉकडाऊनला राज्यात अतिशय मिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. बरेच लोक त्याचे योग्यरित्या अनुसरण करत आहेत, तर काही लोक अजूनही रस्त्यावर फिरत आहेत.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area