आत्महत्या करण्याचं ‘एप्रिल फूल’ नाटक अंगलट, गळफास बसून तरुणाचा मृत्यू

 सिद्धार्थला फेसबुक लाईव्ह ऑन करुन आत्महत्येची भीती घालत मित्रांना 'एप्रिल फूल' करायचं होतं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे (Kerala suicide April Fool prank)
तिरुअनंतपुरम : आत्महत्या करत असल्याचं ‘एप्रिल फूल’ नाटक केरळातील तरुणाच्या जीवावर उठलं. फेसबुक लाईव्ह ऑन करुन गळफास घेत असल्याचा बनाव तरुणाच्या अंगलट आला. मित्रांना ‘एप्रिल फूल’ करण्याच्या नादात तरुणाचा गळफास बसून तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kerala Youth Reportedly died accidentally while staging suicide scene as April Fool prank)


रात्रीच्या जेवणानंतर एप्रिल फूल प्रँक

सिद्धार्थ अजय नावाचा तरुण आपली बहीण आणि पालकांसह केरळमधील थलवाडीजवळ असलेल्या किलीरुर भागात राहत होता. हे कुटुंब भाड्याच्या घरात वास्तव्यास होतं. एक एप्रिलच्या रात्री जेवणानंतर सिद्धार्थ आपल्या खोलीत गेला. मात्र झोपायला अवकाश असतानाही सिद्धार्थ बराच बाहेर आला नाही, त्यामुळे त्याची आई रुममध्ये डोकवायला गेली, तर तिला धक्काच बसला.


पंख्याला गळफास घेताना मृत्यू

सिद्धार्थ अजय त्याच्या रुममधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. कुटुंबाने धावाधाव करत त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही, असे वृत्त न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.


फेसबुक लाईव्ह ऑन करुन बनाव

पोलिसांनी तरुणाच्या घरी जाऊन तपास केला असता सिद्धार्थच्या रुममध्ये त्यांना त्याचा मोबाईल आढळला. खिडकीजवळ ठेवलेल्या मोबाईलमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग मोड ऑन होता. आता सिद्धार्थ फेसबुक लाईव्ह ऑन करुन खरंच आत्महत्या करायची होती, की सुसाईड सीन क्रिएट करुन आत्महत्येची भीती घालत मित्रांना ‘एप्रिल फूल’ करायचं होतं, हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. (Kerala Youth Reportedly died accidentally while staging suicide scene as April Fool prank)


चादर गळ्याभोवती आवळल्याने श्वास गुदमरला

सिद्धार्थने आपल्या खोलीतील बेडवरील चादर पंख्याला बांधून आत्महत्येचा बनाव करण्याचा प्लॅन आखला होता. तीच चादर गळ्याभोवती गुंडाळली गेल्याने त्याला गळफास बसल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन अधिक तपास सुरु केला आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area