कोल्जिहापूर: ल्हाधिकारी दौलत देसाई यांनी परिजिह्यातून कोल्हापूर जिह्यात येणार्या नागरिकांना प्रवेशबंदी (restriction) केल्याचे स्पष्ट केले असून इतर नियमही कठोररीत्या राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनासह, पोलीस, आरोग्य आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या यंत्रणा गतिमान झाल्या आहेत. बाहेरुन येणार्या वाहनांना रोखण्यासाठी जिह्यात प्रवेश करणार्या नाक्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्याचबरोबर शहरातही पोलीसांनी हालचाली गतिमान करुन विनाकारण फिरणार्या वाहनचालकांची कसून तपासणी केली. त्याचबरोबर जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार पोलीस यंत्रणेसह आरोग्य आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या यंत्रणा गतिमान झाल्या.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रवासावर जे निर्बंध (restriction)लावले आहेत. त्यामध्ये आता जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर काही तातडीच्या कारणांमुळे प्रवास करावा लागला तर ई- पास अनिवार्य असेल. महाराष्ट्र पोलिसांच्या covid19.mhpolice.in या वेबसाईट वर जाऊन ई - पाससाठी अर्ज करायचा आहे. गरज पडल्यास आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यालाही भेट देऊन याबाबत पोलिसांची मदत घेता येईल. (local news)
आंतरजिल्हा आणि आंतरशहर वाहतुक ही फक्त अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अत्यंविधीसाठी, कुंटुंबातील व्यक्तींच्या आजारपणासाठी सुरू राहण्यास परवानगी आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांना 10 हजार दंड केला जाईल.