गोकुळ दूधसंघ निवडणूक : ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू, मेळाव्यानंतर आठ जण पॉझिटिव्ह

 सुभाष पाटील हे शाहूवाडी तालुक्यातील डोणोली येथील कै. सदाशिव पाटील दूध संस्थेचे ठरावधारक होते. (Kolhapur Gokul Election COVID)
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला (Kolhapur Gokul Doodh Sangh Election) अवघे काही दिवस बाकी असताना ठरावधारकाचा मृत्यू झाला. 54 वर्षीय सुभाष सदाशिव पाटील यांचं कोरोनामुळे निधन झालं. मागील आठवड्यात झालेल्या मेळाव्यानंतर आठ ठरावधारक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. (Kolhapur Gokul Doodh Sangh Election Resolution holder dies of COVID)

कोल्हापूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये सुभाष सदाशिव पाटील यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुभाष पाटील हे शाहूवाडी तालुक्यातील डोणोली येथील कै. सदाशिव पाटील दूध संस्थेचे ठरावधारक होते. मागील आठवड्यात झालेल्या मेळाव्यानंतर ठरावधारक आणि उमेदवारी अर्ज भरलेले काही इच्छुक उमेदवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे ठरावधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. कोरोना परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरापासून लांबलेली ही निवडणूक 2 मे रोजी होणार आहे. मतदानाला काही दिवस बाकी असले, तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण गेल्या दोन महिन्यांआधीच तापायला सुरुवात झाली होती.


गोकुळ बचाव समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून सत्ताधारी महाडिक गटाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केलीय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना एकत्र आणत सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा केली. मात्र अवघ्या चार दिवसात त्यात फूट पडली. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आघाडीची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला. गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहणार असल्याचं सरुडकरांनी स्पष्ट केलं.


गोकुळ दूध संघ का आहे महत्त्वाचा?


दू
ध संघाचा जिल्ह्यात आणि राज्यात लौकिक

रोज 30 ते 35 लाख लिटर दुधाचं संकलन


मुंबई पुण्यासह अनेक मोठ्या शहरात गोकुळ दुधाला मागणी


गोकुळची रोजची कोट्यवधीची उलाढाल


गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघात


कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

6 ते 20 एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी

22 एप्रिल – उमेदवारांना चिन्हांचे वाटप

2 मे – मतदान

4 मे – मतमोजणीTags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area