मुख्यमंत्र्यांचा दुसऱ्या लाटेचा अंदाज अचूक ठरला, पण तयारी काय केली सांगा?; भाजपचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. (madhav bhandari taunt cm uddhav thackeray over corona second wave)मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यांचा हा अंदाज अचूक ठरला आहे. पण अंदाज वर्तवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या पाच महिन्यात कोरोना रोखण्यासाठी काय तयारी केली ते सांगा?, असा सवाल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे. (madhav bhandari taunt cm uddhav thackeray over corona second wave)

माधव भंडारी यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. गेल्या वर्षी राज्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 नोव्हेंबर 2020 रोजी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, जनतेने सहकार्य केले म्हणून कोरोना रुग्णांचा फुगत चाललेला आकडा जरूर खाली आणला. पण कोरोनाचे संकट संपले असू समजू नका. पाश्चात्य देशांचा विचार केला तर दुसरी-तिसरी लाट येते आहे. पहिल्या लाटेशी तुलना केली तर ही लाट त्सुनामी आहे की काय, अशी भीती वाटते. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली भीती पाच महिन्यांनी महाराष्ट्रात शब्दशः खरी ठरल्याचे दिसते. त्याचप्रमाणे दोन महिन्यांपूर्वी 22 फेब्रुवारी 2021 च्या फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली का हे आठ दहा दिवसात कळेल, असे म्हटले होते, असं भंडारी यांनी सांगितलं.

राज्यांसमोर हात पसरावा लागला नसता

दुसऱ्या लाटेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अचूक अंदाज होता हे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसते. त्यामुळेच, इतकी पूर्व कल्पना असताना गेल्या पाच महिन्यात राज्य सरकारने दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काय तयारी केली याची माहिती आता जनतेला दिली पाहिजे. नोव्हेंबर महिन्यातच राज्यातील सर्व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लँटचे काम सुरू केले असते तर आज संकटाच्या वेळी ऑक्सिजनसाठी अशी तडफड करावी लागली नसती आणि इतर राज्यांसमोर हातही पसरावा लागला नसता. कोरोनावरील उपचारात रेमडेसिविरचा उपयोग होतो हे गेल्या वर्षी पहिल्या लाटेतच ध्यानात आले होते. हे ध्यानात घेऊन पाच महिन्यात रेमडिसिवीर उपलब्ध करून घेण्यासाठीही पुरेशी तयारी करता आली असती, असंही त्यांनी म्हटलं आहे. (madhav bhandari taunt cm uddhav thackeray over corona second wave)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area