मरणकळा सोसणाऱ्यांचा जीवनदाता, लोकांना देतो मोफत ऑक्सिजन सिलिंडर; वाचा ‘ऑक्सिजन मॅन’ची अनोखी कहाणी

 शहानवाज शेख यांची विशेष चर्च होत आहे. लोकांचा जीव वाचावा म्हणून त्यांनी स्वत:ची कार विकत लोकांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन दिले आहेत. (mumbai oxygen man shahnawaz shaikh oxygen cylinders)मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोज हजारो लोक रुग्णालयांत उपचारासाठी दाखल होत आहेत. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहेत. या पार्श्वभूमीवर शहानवाज शेख (Shahnawaz shaikh) यांची विशेष चर्च होत आहे. लोकांचा जीव वाचावा म्हणून त्यांनी स्वत:ची कार विकत लोकांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन दिले आहे. तसेच लोकांना कशा प्रकारे ऑक्सिजन उपलब्ध करुन देता येईल, यासाठी ते जिवाचं रान करत आहेत. त्यांच्या याच धडपडीमुळे ते समस्त मुंबईत ऑक्जिजन मॅन (Oxygen Man) म्हणून ओळखले जात आहेत. (Mumbai Malad Shahnawaz shaikh helping Corona patient giving them Oxygen Cylinders people calling him as Oxygen Man)

मित्राच्या बहिणीचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

सध्या कोरोना महामारीचा प्रकोप वाढल्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून घरात बसून आहेत. तसे निर्देश राज्य सरकारनेसुद्धा दिले आहेत. मात्र, सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात शहानवाज शेख दिवसरात्र एक करुन लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या एका मित्राच्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मित्राच्या बहिणीचा रिक्षामध्येच मृत्यू झाला. याच गोष्टीचा शहनवाज यांना धक्का बसला आणि त्यांनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम करण्याचं ठरवलं.


ऑक्सिजन सिलिंडरसाठी कार विकली

मित्राच्या बहिणीचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्यानंतर शहानवाज यांनी लोकांची मदत करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी जमेल तेवढ्या लोकांना ऑक्सिजनचे सिलिंडल देण्याचे ठरवले. त्यासाठी भांडवल उभं करण्यासाठी त्यांनी स्वत:ची कार विकली. स्वत:ची फोर्ड एंडेव्हर ही कार विकत त्यांनी 60 ऑक्सिजन सिलिंडर खऱेदी केले. तसेच 40 सिलिंडर भाड्याने घेतले. असे एकूण त्यांच्याकडे सध्या 200 ऑक्सिजनचे सिलिंडर आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या या कार्याचा अनेकांना फायदा होतो झाला. गरजूंना ते ऑक्सिजनचे सिलिंडर देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये त्यांनी जवळपास 4 हजार कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन सिलिंडर देऊन त्यांची मदत केली होती.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area