नागपुरात ‘लेडी डॉन’ची हत्या, भरचौकात चाकूचे सपासप वार

 नागपूर शहरातील तांडापेठेत भरचौकात पिंकी शर्माची हत्या करण्यात आली. (Nagpur Lady Don Pinky Sharma Murder)नागपूर : वस्तीत दबंगगिरी करणारी ‘लेडी डॉन’ पिंकी शर्मा (Lady Don Pinky Sharma) हिची हत्या करण्यात आली. चाकूने सपासप वार करुन पिंकीची निर्घृण हत्या करण्यात आली. वादावादीतून दोघांनी पिंकीला संपवल्याचा आरोप आहे. नागपुरात भरदिवसा घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. (Nagpur Crime Lady Don Pinky Sharma Murder in Pachpavali)
अवैध धंद्यांवरुन वादावादी

नागपूर शहरातील तांडापेठेत भरचौकात पिंकी शर्माची हत्या करण्यात आली. अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना पिंकी शर्मा धमक्या देत असल्याचं बोललं जातं. सोमवारी दुपारी पिंकीचा आरोपींसोबत वाद झाला होता. याच कारणावरुन दोघा आरोपींनी तिची हत्या केल्याचा आरोप आहे.


चाकूहल्ल्यानंतर पिंकीची मदतीसाठी धावाधाव

आरोपींनी पिंकीवर चाकूहल्ला केल्यानंतर ती सोमवारी संध्याकाळी पाचपावली भागात सैरावैरा पळत होती. अनेकांच्या घराच्या दिशेने धावाधाव करत ती मदतीसाठी याचना करत होती. मात्र तिच्या मदतीला कुणीही आलं नाही. पाठलाग करुन आरोपींनी तिला गाठलं आणि तिच्यावर चाकूचे सपासप वार केल्याची माहिती आहे.


पाचपावली पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल

रुग्णालयात नेण्याआधीच पिंकीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नागपूरमधील पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area