रेमडेसिविर, कृत्रिम प्राणवायू, खाटांचे कोल्हापुरात योग्य नियोजन – यड्रावकर

 कृत्रिम प्राणवायू, खाट याचेही नियोजन केले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन, कृत्रिम प्राणवायू, खाट याची कमतरता राहणार नाही यादृष्टीने नियोजन केले जात आहे. ७०० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत आहेत.

गडहिंग्लज येथील हवेतून प्राणवायू तयार करण्याचे केंद्र कोविड काळजी केंद्रात पुन्हा सक्षमपणे सुरू होत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शुक्रवारी येथे दिली.

करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने उपाययोजना करण्याबाबत त्यांनी येथे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. करोना निवारणासाठी कोणत्या  उपाय योजना करणे गरजेचे आहे, याचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.  त्यानंतर ते म्हणाले,  रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा पडणार नाही याची काळजी घेतली जात  आहे. गरजेप्रमाणे ते आणखी उपलब्ध केले जात आहेत. कृत्रिम प्राणवायू, खाट याचेही नियोजन केले आहे.


उदगाव केंद्र पुन्हा सुरू

शिरोळ तालुक्यात करोना बाधित वाढती संख्या लक्षात घेऊन कुंजवन उदगाव येथे कोविड काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्याची तयारी केली आहे, असे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.  त्यांनी शिरोळ येथे यासंदर्भात आज बैठक घेऊन केंद्र सक्षमपणे सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. येथे ४९ खोल्या व दोन प्रशस्त सभागृहांमध्ये  केंद्र सुरू केले आहे. ‘गतवर्षी एक सप्टेंबरला केंद्र सुरू झाल्यानंतर ७१५ रुग्णांवर उपचार केले. १५ जानेवारी रोजी रुग्ण नसल्याने केंद्र बंद केले होते. सध्या पन्नास खाटा उपलब्ध असून यापैकी १४ कृत्रिम प्राणवायूचे असतील. रुग्ण संख्येनुसार आणखी १०० खाटा उपलब्ध केले जाणार आहेत,’ असे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पी. एस. दातार यांनी सांगितले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area