शेवटचं भेटू आणि थांबू, 14 वर्षांच्या प्रेमाचा थरारक अंत, पुण्यातील धक्कादायक प्रेम कहाणी

 चौदा वर्षांपासून प्रेमप्रकरण असूनसुद्धा लग्न करण्यासाठी नकार दिल्यामुळे प्रियकराने आपल्या प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (pune man murdered lover)
पुणे : चौदा वर्षांपासून प्रेमप्रकरण असूनसुद्धा लग्न करण्यासाठी नकार दिल्यामुळे प्रियकराने आपल्या प्रेयसीचा खून केला आहे. मनीषा गेडाम असं मृत मुलीचं नाव असून पुण्यात ही धक्कादायक घटना घडली. एकदा शेवटचं भेटण्याच्या बहाण्याने या प्रियकराने मनीषाला बोलावून घेतले होते. खून केल्यानंतर तब्बल 17 दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून सागर गुडाव असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. (Pune man murdered his lover denying marry with him were in relationship from 14 years)


प्रेयसीला शेवटचं भेटायला बोलवलं

मिळालेल्या माहितीनुसार मनीषा आणि सागर दोघेही अमरावती येथील रहिवासी आहेत. मागील 14 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. परंतु कुटुंबियांच्या विरोधामुळे मनीषा लग्न करण्यासाठी नकार देत होती. सागर तिला सातत्याने फोन करायचा. परंतु सागरच्या फोनलासुद्दा ती प्रतिसाद देत नव्हती. दरम्यान तुला शेवटचे भेटायचे आहे असे सांगून सागरने 13 मार्च रोजी मनिषाला भेटायला बोलावले. यावेळी दोघेही दुचाकीवरुन फिरण्यासाठी बाहेर पडले.


दोघेही धरणाच्या दिशेने निघाले, आणि…

घराबाहेर पडल्यानंतर महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी जाण्याचा दोघांचाही प्लॅन होता. परंतु तो प्लॅन रद्द करून दोघेही भाटघर धरणाच्या दिशेने गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर मनीषा बेसावध असताना आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. त्यानंतर मनिषाचा खून करुन सागर घटनास्थळावरून पसार झाला. मागील 17 दिवसांपासून पोलीस या घटनेचा तपास करत होते. काल (31 मार्च) या आरोपीला अटक करण्यात आली.


दरम्यान, तब्बल 14 वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही आरोपी सागरने आपल्या प्रेयसीचा खून केल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. शेवटचं भेटायला येण्याचा आग्रह करुन थेट डोक्यात दगड घालून खून केल्यामुळे आरोपी प्रियकर सागरविरोधात रोष व्यक्त केला जातोय. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area