धक्कादायक! मीरा-भाईंदरमध्ये 60 वर्षीय स्वयंघोषित धर्मगुरुचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 हा धर्मगुरू मूळचा गुजरातमधील आहे. मात्र, तो सध्या मीरा-भाईंदरमध्ये वास्तव्याला आहे. | Rape religious leaderमुंबई: मीरा-भाईंदर परिसरात एका स्वयंघोषित धर्मगुरूने 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा धर्मगुरू मूळचा गुजरातमधील आहे. मात्र, तो सध्या मीरा-भाईंदरमध्ये वास्तव्याला आहे. पोलिसांनी वेश्या व्यवसाय सुरु असणाऱ्या हॉटेलवर धाड टाकल्यानंतर हा सारा प्रकार समोर आला. (Rape on 16 year old girl by religious leader in Maharshtra)


मीरारोड पूर्वेकडील महामार्गालगत असणाऱ्या पय्याडे हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने पय्याडे हॉटेलवर धाड टाकली. त्यावेळी वेश्यागमनासाठी आणलेल्या तीन मुली हॉटेलमध्ये सापडल्या. यामध्ये एका 16 वर्षांच्या मुलीचाही समावेश होता.


पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीने धक्कादायक कबुली दिली. मीरा-भाईंदर परिसरातील एक धर्मगुरू तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करत होता. या पीडित मुलीची विचारपूस करुन तिच्याकडून सर्व माहिती काढून घेण्यात आली. त्यानंतर नया नगर पोलिसांनी या 60 वर्षीय धर्मगुरुला बेड्या ठोकल्या आहेत.


नया नगर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कायदे कलमानुसार या धर्मगुरुवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या धर्मगुरुची कसून चौकशी करत आहेत. यामधून आणखी काही माहिती समोर येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


मीरा-भाईंदरच्या सोनम शॉपिंग सेंटरला आग

मीरा-भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कल जवळ असलेल्या सोनम शॉपिंग सेंटरमधील दुकानात शनिवार पहाटे 5.30 च्या सुमारास अचानक आग लागली. आगीत दुकानात असलेले सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या दुकानाच्या बाजूलाच एटीएम सेंटर होते. मात्र, अग्निशामन दलाने वेळीच घटनास्थळी येत आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area