तो गाफिलपणे थांबला, अज्ञातांनी येऊन धारदार शस्त्राने भोसकलं, 20 वर्षीय तरुणाचा करुण अंत

 जिल्ह्यातील तासागावात एका 20 वर्षीय तरुणाला धारधार शस्त्राने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (sangli young man murder)
सांगली : जिल्ह्यातील तासागावात एका 20 वर्षीय तरुणाला शुक्रवारी (2 मार्च) धारधार शस्त्राने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे तासगावात तणावाचं वातावरण आहे. मृत तरुणाचं नाव लवेश धोत्रे असं असून 5 ते 6 अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. पूर्व वैमनस्यातून हा खून केल्याचे सांगण्यात येत आहे.   (Sangli 20 year young man murdered attackers absconded)


5 ते 6 जणांचा धारदार शस्त्राने हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील तासगावात मृत लवेश धोत्रे या 20 वर्षीय तरुणाचे काही लोकांशी मतभेद होते. यावेळी लवेश तासगावातील महात्मा गांधी उद्यानासमोर काही कामानिमित्त उभा होता. लवेश गाफीलपणे उभा असल्याचे समजल्यावर 5 ते 6 जणांनी त्याच्यावर अचानकपणे हल्ला केला. अचानकपणे हल्ला झाल्यामुळे हा तरुण ऐनवेळी गोंधळला. अज्ञात हल्लेखोरांनी लवेशला धारदार शस्त्राने भोसकलं. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे हा तरुण तिथेच कोसळला. त्यानंतर संशयित हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले.


दरम्यान, ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ दाखल होत चौकशी सुरु केली. या घटनेतील हल्लेखोर पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


रायगडमध्ये महिलेवर बलात्कार करुन, हत्या

रायगडमध्ये विटभट्टी कामगार असलेल्या आदिवासी कातकरी महिलेवर बलात्कार करुन तिची 31 मार्च रोजी हत्या केली. मिळेलेल्या माहितीनुसार मृत महिला (वय 42) घरी लग्न असल्याने आपल्या नवऱ्याला वीटभट्टीवरुन आणण्यासाठी सकाळी 10 च्या दरम्यान जवळच्या गावातील रिक्षा भाड्याने घेऊन निघाली. मात्र, ती आपल्या नवऱ्यापर्यंत पोहचलीच नाही. बऱ्याच उशिराने दुपारी 2 च्या दरम्यान संबंधित रिक्षाचालक वीटभट्टीवर तिच्या नवऱ्याकडे गेला. तुझी बायको तुला न्यायला आली आहे आणि मालक सुट्टी देणार नाही म्हणून इथं न येता पुलाखाली थांबली आहे तर तू पटकन आवरून चल असं तो म्हणाला. त्यानंतर नवरा जेव्हा 100 मीटर अंतरावरील पुलाखाली पोहोचला तेव्हा त्याला कडेच्या झुडुपात बायको बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली. पीडितेच्या नवऱ्याने त्या रिक्षा चालकास बायकोला दवाखान्यात नेऊ असे म्हटले. मात्र रिक्षा चालकाने मला काम आहे सांगून तिथून पळ काढला. त्यानंतर पीडितेला वीटभट्टी मालकाच्या गाडीतून दवाखान्यात नेण्यात आले. या ठिकाणी महिला मृत असल्याचे निष्पन्न झाले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area