अजित पवारांनी पंढरपुरात वात पेटवली, दोन दिवसांच्या दौऱ्यात भाजपला धक्क्यावर धक्के

 राष्ट्रवादीने इथे भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ (Bhagirath Bhalke) यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं आहे.
पंढरपूर : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Pandharpur Mangalwedha bypolls) प्रचारासाठी दोन दिवस दौऱ्यावर आहेत. त्यांनी दोन दिवसात प्रचारसभांचा धडाका लावला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने इथे भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ (Bhagirath Bhalke) यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं आहे. मात्र अजित पवारांनी स्वत: या निवडणूक प्रचारात उतरुन भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. (Sanjay Nehatrao and Suresh Nehatrao meets NCP leader Ajit Pawar during Maharashtra Pandharpur Mangalwedha bypolls rally )


अजित पवारांनी आज भाजपाला आणखी एक धक्का दिला. पंढरपूर येथील मोहिते पाटील समर्थक संतोष नेहतराव (Sanjay Nehatrao) आणि परिचारक गटाचे बांधकाम सभापती नगरसेवक सुरेश नेहतराव (Suresh Nehatrao) यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. मंगळवेढा येथे हुलजंती येथील सभेत ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.


अजित पवारांचा पंढरपुरात तळ

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक भाजप आणि महा विकास आघाडीने निवडणूक राज्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेची केली आहे. सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मूळ राष्ट्रवादीसाठी साधी सोपी वाटणारी लढत परिचारक आणि अवताडे गट एकत्रित आल्यामुळे आव्हान निर्माण झाले आहे. भाजपाला रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवस मतदारसंघात तळ ठोकून आहेत. त्यांनी पंढरपुरातील नेतेमंडळींची भेट घेऊन राजकीय रणनीती तयार करण्याचा प्रयत्न केला.


राजकारणामध्ये कुणी कुणाचे कायमचे शत्रू नसते याची परिस्थिती पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत येत आहे. पंढरपूर मंगळवेढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. यासाठी सुरुवातीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशेष लक्ष दिले. मात्र भारतीय जनता पार्टीने उमेदवाराची चाचपणी करत असताना कट्टर वैरी असणारे मोहिते-पाटील आणि परिचारक यांना एकत्र आणून समाधान आवताडे यांना उमेदवारी देऊन तगडे आव्हान निर्माण केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area